महापालिका संभ्रमात; २ मेपर्यंत जनता भाजी बाजार बंदचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:20 AM2021-04-23T04:20:35+5:302021-04-23T04:20:35+5:30

किराणा, कृषी सेवा केंद्रांना मुभा जनता भाजी बाजारातील होलसेल, किरकोळ भाजीपाला व फळ विक्रीला २ मेपर्यंत पूर्णत: बंदी घालण्यात ...

Municipal confusion; Public vegetable market closed till May 2 | महापालिका संभ्रमात; २ मेपर्यंत जनता भाजी बाजार बंदचा आदेश

महापालिका संभ्रमात; २ मेपर्यंत जनता भाजी बाजार बंदचा आदेश

Next

किराणा, कृषी सेवा केंद्रांना मुभा

जनता भाजी बाजारातील होलसेल, किरकोळ भाजीपाला व फळ विक्रीला २ मेपर्यंत पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. यादरम्यान, बाजारातील किराणा दुकान व कृषिसेवा केंद्राची दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. उर्वरित बाजार यापूर्वी दिलेल्या सूचनेप्रमाणे वाशिम राेड येथील महात्मा फुले भाजी बाजार, भाटे क्लब प्रांगण तसेच मुंगीलाल बाजोरिया प्रांगणात करणे बंधनकारक राहील, असे आदेशात नमूद आहे.

काेराेनाच्या आडून मनपा आयुक्तांनी जनता भाजी बाजारातील दुकानांवर कारवाईचा प्रयत्न केल्यास त्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा भंग झाला तर त्याला सर्वस्वी महापालिका जबाबदार राहील. केवळ जनता भाजी बाजारातूनच काेराेनाचा प्रसार हाेताे, ही बाब अनाकलनीय आहे.

-साजीद खान पठाण, विराेधी पक्षनेता मनपा

Web Title: Municipal confusion; Public vegetable market closed till May 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.