अकोट : संपूर्ण देशात कोरोनाचा संसर्ग सुरू असून, यापासून बचाव करण्याकरिता शासनाने नागरिकांकरिता वेगवेगळे आदेश काढून त्याची अंमलबजावणी नगर परिषद आरोग्य कर्मचारी व नगर परिषद कर्मचाऱ्यांकडून करून घेण्यात येत आहे. या कर्मचाºयांना सुरक्षेचे साहित्य व विमा संरक्षण कवच देण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे अकोटात नगरपालिका कर्मचाºयांनी २७ एप्रिल रोजी काळ्या फिती लावून आंदोलन केले.नगरपालिका कर्मचाºयांना आपले कर्तव्य सार्वजनिक ठिकाणी पार पाडावे लागते. यावेळी या कर्मचाºयांकडे मास्क व्यतिरिक्त कोणतेही संरक्षण नसते, तसेच राज्यात काही ठिकाणी काम करताना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे कर्मचाºयांना क्वारंटीनसुद्धा करण्यात आले आहे. महाराष्ट्र नगर परिषद कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेने शासनाकडे नगर परिषद सफाई कामगार व अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी व अधिकारी यांच्याकरिता विमा संरक्षण कवचाची मागणी लावून धरण्यात आली होती; परंतु शासनाने ही मागणी अद्यापही पूर्ण केली नाही, तसेच वेतन अनुदानसुद्धा मंजूर केलेले नाही. शासन फक्त सफाई कामगार कर्मचारी व इतर कर्मचाºयांचे शब्दाने स्वागत व आभार मानून सर्व कर्मचाºयांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार करीत आहे. या बाबीचा निषेध म्हणून महाराष्ट्र कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या अकोला जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, नगरपंचायतीचे सफाई कामगार व अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी व अधिकारी यांनी कार्यालयात काळ्या फिती लावून काम केले. या आंदोलनात राज्य कार्यकारिणी सचिव गजानन इंगळे, जिल्हाध्यक्ष प्रदीप रावणकार, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण शर्मा व रमेश गिरी, सचिव दीपक सुरवाडे, अध्यक्ष अकोट ईश्वरदास पवार, तेल्हारा भरत मलीये, बाळापूर नागोराव सुरजुसे, मूर्तिजापूर हफिज खा, पातूर नबी खान व बार्शीटाकळी नगर पंचायतीचे रुपेश पिंजरकर यांच्या नेतृत्वात सर्व नगर परिषद कर्मचाºयांनी सहभाग घेतला.
नगरपालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 5:47 PM