मनपाचे अग्निशमन अधिकारी ठाकरे निलंबित; दोन कर्मचारी बडतर्फ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 11:01 AM2020-01-28T11:01:14+5:302020-01-28T11:01:33+5:30
आयुक्त संजय कापडणीस यांनी कर्तव्यात कुचराई केल्याप्रकरणी रमेश ठाकरे यांना निलंबित करण्याचा आदेश जारी केला.
अकोला : महापालिकेच्या अग्निशमन विभागात जुगार खेळणाºया कर्मचाºयांना पाठीशी घालणे अग्निशमन अधिकारी रमेश ठाकरे यांच्या चांगलेच अंगलट आले. सोमवारी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी अग्निशमन अधिकारी ठाकरे यांना निलंबित करण्यासह जुगार खेळणाºया दोन मानसेवी कर्मचाºयांना सेवेतून बडतर्फ करण्याचा आदेश जारी केला. आयुक्तांच्या तडकाफडकी निर्णयामुळे महापालिकेतील कामचुकार कर्मचाºयांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
महापालिकेच्या अग्निशमन विभागात सेवारत कर्मचारी हजेरी पुस्तिकेवर स्वाक्षरी करून अनेकदा कामावरून पळ काढतात. अत्यावश्यक सुविधेमध्ये समावेश असलेल्या या विभागाचा कारभार रामभरोसे सुरू असल्याची परिस्थिती आहे. कर्मचाºयांच्या मनमानी व बेताल कारभारावर अग्निशमन अधिकारी रमेश ठाकरे यांचे कवडीचेही नियंत्रण नसल्यामुळेच चक्क कार्यालयात जुगार खेळण्यापर्यंत कर्मचाºयांनी मजल गाठल्याचे धक्कादायक प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी सोमवारी दुपारी आयोजित केलेल्या बैठकीत अग्निशनम विभागातील जुगार खेळणाºया कर्मचाºयांचा ‘व्हिडिओ व्हायरल’ झाल्याचे सांगत संबंधितांवर काय कारवाई केली, अशी विचारणा अग्निशमन अधिकारी ठाकरे यांना केली. त्यावर ‘मला चौकशी करावी लागेल’ असे सांगत ठाकरे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सुरुवातीला हा व्हिडिओ जुना असल्याचे सांगत त्यांनी कारवाईवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ जुना असला तरी अग्निशमन विभागात जुगार खेळल्या जातो, हे नाकारून चालणार का, असा सवाल आयुक्त कापडणीस यांनी उपस्थित केल्यावर ठाकरे यांनी सदर प्रकरणी चौकशी करतो, असे मोघम उत्तर दिले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आयुक्त संजय कापडणीस यांनी कर्तव्यात कुचराई केल्याप्रकरणी रमेश ठाकरे यांना निलंबित करण्याचा आदेश जारी केला. तसेच जुगार खेळणारा वाहन चालक गुलाम मुस्तफा खान व सुरक्षा रक्षक शेख मुजाहिद खान या मानसेवी कर्मचाºयांना सेवेतून बडतर्फ करण्याचा आदेश दिला.
अखेर सहायक अधिकाºयाने नावे उघड केली
आयुक्त संजय कापडणीस यांनी सर्व विभाग प्रमुखांच्या समक्ष अग्निशमन अधिकारी रमेश ठाकरे यांना व्हिडिओ दाखवत जुगारी कर्मचाऱ्यांची नावे विचारली. त्यावर हा व्हिडिओ तुम्ही मला पाठवा, असे ठाकरे यांनी म्हणताच संतापलेल्या आयुक्तांनी ठाकरे यांची कानउघाडणी केली. अखेर अग्निशमन विभागातील सहायक अधिकारी प्रकाश फुलंबरकर यांनी व्हिडिओ पाहून कर्मचाºयांची नावे उघड केली. यामध्ये एका सेवानिवृत्त कर्मचाºयाचाही समावेश आहे.
जुगारी कर्मचाºयांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावरही अग्निशमन अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत होते. मनपाची नाचक्की करणाºया कर्मचाºयांची पाठराखण होऊ शकत नाही. रमेश ठाकरे यांना निलंबित करून ओळख पटविण्यात आलेल्या २ कर्मचाºयांची सेवा समाप्त करण्याचा आदेश दिला आहे.
- संजय कापडणीस, आयुक्त, मनपा