नाफेडने केली सोयाबीन खरेदी सुरू !

By admin | Published: October 29, 2016 02:50 AM2016-10-29T02:50:58+5:302016-10-29T02:50:58+5:30

पहिल्या दिवशी हमीदर व बोनससह खरेदी

Nafed started buying soybean! | नाफेडने केली सोयाबीन खरेदी सुरू !

नाफेडने केली सोयाबीन खरेदी सुरू !

Next

अकोला, दि. २८- नाफेडमार्फत सोयाबीन खरेदीला जिल्हय़ात सुरुवात करण्यात आली असून, पहिल्या दिवशी हमीदर व बोनससह प्रतिक्विंटल २,७७५ रुपये दराने सोयाबीनची खरेदी करण्यात आली.
या योजनेंतर्गत गुरुवारी अकोला जीनिंग अँन्ड प्रेसिंग को-ऑप फॅक्टरी येथे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नीळकंठ खेडकर यांनी काटा पूजन केले. यावेळी संचालक रमेश चांडक, चंद्रशेखर खेडकर, जिल्हा मार्केटिंग अधिकारी मनोज वाजपेयी, नाफेडचे प्रतिनिधी नरेश चौबे, तालुका खरेदी-विक्री समितीचे व्यवस्थापक नरेंद्र वैराळे व ग्रेडर संजय कोरपे आदी उपस्थित होते.
दरम्यान, सोयाबीन विक्रीला आणताना शेतकर्‍यांनी मात्र काळजी घेणे गरजेचे आहे. सोयाबीन वाळवून, सुकवून व स्वच्छ करू न विक्रीस आणणे क्रमप्राप्त आहे.
सोबत शेताचा सात-बारा, पेरेपत्रक, बँक खाते पुस्तकाची झेरॉक्स आणणेही गरजेचे असल्याची माहिती नाफेडच्या प्रतिनिधींनी दिली.

Web Title: Nafed started buying soybean!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.