शालार्थ प्रणालीमध्ये नाव नसल्याने, शिक्षकांचा आत्मदहनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 01:50 AM2017-10-14T01:50:10+5:302017-10-14T01:50:56+5:30

प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांकडे अनेकदा तक्रारी करूनसुद्धा शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे शिक्षकांवर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या दोन शिक्षकांनी शिक्षण संचालकांकडे तक्रार करीत आत्मदहनाचा इशारा दिला आहे. 

Since the name of the school does not have a name, teachers' autobiography | शालार्थ प्रणालीमध्ये नाव नसल्याने, शिक्षकांचा आत्मदहनाचा इशारा

शालार्थ प्रणालीमध्ये नाव नसल्याने, शिक्षकांचा आत्मदहनाचा इशारा

Next
ठळक मुद्देशिक्षण संचालकांकडे तक्रार कुटुंबावर उपासमारीची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट नसल्यामुळे दोन शिक्षकांचे नोव्हेंबर २0१६ पासून वेतन थकीत आहे. प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांकडे अनेकदा तक्रारी करूनसुद्धा शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे शिक्षकांवर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या दोन शिक्षकांनी शिक्षण संचालकांकडे तक्रार करीत आत्मदहनाचा इशारा दिला आहे. 
येथील क्रांतिज्योती मराठी प्राथमिक शाळेतील शिक्षक अमोल रामदास मडावी व संजय भीमराव धोत्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात न आल्यामुळे त्यांचे नोव्हेंबर २0१६ पासून वेतन थकीत आहे. त्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव शाळेने २६ ऑक्टोबर २0१६ रोजी अधीक्षक वेतन पथक यांच्याकडे सादर केला होता. परंतु, त्यात काही त्रुटी होती. त्यानंतर दोन्ही शिक्षकांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी व शिक्षक उपसंचालक कार्यालयाकडून प्राप्त त्रुटींची पूर्ततादेखील केली; परंतु त्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आली नाहीत. या दोन्ही शिक्षकांनी वारंवार शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याबाबत प्रयत्न केले. त्रुटीसुद्धा दूर केल्या; परंतु त्यानंतरही जाणीवपूर्वक शालार्थ प्रणालीमध्ये नावे समाविष्ट करण्यात येत नसल्याने, त्यांचा गत दहा महिन्यांपासून पगार रखडला आहे. त्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
दिवाळीपूर्वी त्यांना त्यांचे नियमित व थकीत वेतन न मिळाल्यास आत्मदहन करू, असा इशारा  शिक्षक अमोल मडावी व संजय धोत्रे यांनी दिला आहे. या शिक्षकांनी पालकमंत्री, जिल्हाधिकार्‍यांकडेसुद्धा तक्रारी केल्या आहेत. 

Web Title: Since the name of the school does not have a name, teachers' autobiography

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.