पक्ष बळकटीसाठी मतभेद विसरून काम करण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:17 AM2021-02-08T04:17:28+5:302021-02-08T04:17:28+5:30
पारस येथे राष्ट्रवादी परिवार संवाद व पक्ष प्रवेश सोहळ्यात कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. यावेळी मंत्री पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ...
पारस येथे राष्ट्रवादी परिवार संवाद व पक्ष प्रवेश सोहळ्यात कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. यावेळी मंत्री पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अठरापगड जाती, बारा बलुतेदार लोकांना न्याय देणारा पक्ष असल्याचे सांगितले. कार्यक्रमात व्यासपीठावरील मान्यवरांचे माजी आमदार बळिराम सिरस्कार आणि तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रश्न मांडले. त्यावर जलसंपदामंत्री जयंत पाटील, राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी समर्पक उत्तरे देत, समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. बाळापूर मतदारसंघात पक्षाचा झालेला पराभवाबाबत तालुकाध्यक्ष शिवाजी म्हैसने यांच्याशी संवाद साधून माहिती घेतली. यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवती अध्यक्षा सक्षणा सलगर, मेहबुब शेख, रविकांत वर्पे, प्रवीण कुंटे-पाटील (अकोला निरीक्षक) सुनील गव्हाणे (विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष) माजी आमदार बळिराम सिरस्कार, माजी आमदार हरिदास भदे, आमदार अमोल मिटकरी, माजी आमदार तुकाराम बिडकर, ज्येष्ठ नेते संतोष कोरपे, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवाजी म्हैसने यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत मानकर, म्हैसने गुरुजी यांनी सूत्रसंचालन केले. विश्वजित शिरसाट यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष शिवाजी म्हैसने, महिला तालुकाध्यक्ष सुनीता ताथोड, युवा नेते धनंजय शिरस्कार, श्यामभाऊ खोपडे, सुहास लांडे, अकील ठेकेदार, जितेंद्र काटे यांनी परिश्रम घेतले. यावेळी माजी आमदार बळिराम सिरस्कार यांच्या नेतृत्वात तालुक्यातील युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.
फोटो: