नेरधामणा बॅरेज अडकले लालफितशाहीत;  कंत्राटदाराला सहा वर्ष विनादंड मुदत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 06:50 PM2018-03-23T18:50:10+5:302018-03-23T18:50:10+5:30

अकोला : अकोला जिल्ह्यातील बहुप्रतिक्षीत नेरधामणा बॅरेजचे काम लालफितशाहीत अडकले असून, या बॅरेजच्या पुढील कामासाठीच्या अनेक अडचनी कायम असल्याने मागील २०१२ पासून हे काम करणाऱ्या कंत्राटदाराला दंड न आकारता काम करण्यासाठी मुदत वाढ देण्याची पाळी पाटबंधारे कार्यालयावर आली.

Nerdhamana barrage stuck in beurocrasy | नेरधामणा बॅरेज अडकले लालफितशाहीत;  कंत्राटदाराला सहा वर्ष विनादंड मुदत वाढ

नेरधामणा बॅरेज अडकले लालफितशाहीत;  कंत्राटदाराला सहा वर्ष विनादंड मुदत वाढ

Next
ठळक मुद्दे२००९ मध्ये ज्यावेळी नेरधामणा बॅरेजचे काम सुरू झाले त्यावेळी १८५ कोटी रू पये किंमत होती तीन वर्षात हे बॅरेज बांधून पुर्ण करणे क्रमप्राप्त होते. पाटबंधारे विभागाकडून होत असलेल्या अनेक तांत्रीक कामांच्या विलंबामुळे या बॅरेजची किंमत आजमितीस ६५० कोटींचा झाला आहे.दरम्यान,असे सर्व असताना २०१२ पासून सहा वर्ष कंत्राटदराला विना दंड मुदत वाढ देण्यात आली.

- राजरत्न सिरसाट

अकोला : अकोला जिल्ह्यातील बहुप्रतिक्षीत नेरधामणा बॅरेजचे काम लालफितशाहीत अडकले असून, या बॅरेजच्या पुढील कामासाठीच्या अनेक अडचनी कायम असल्याने मागील २०१२ पासून हे काम करणाऱ्या कंत्राटदाराला दंड न आकारता काम करण्यासाठी मुदत वाढ देण्याची पाळी पाटबंधारे कार्यालयावर आली. कंत्राटदारामुळे कामास विलंब झाल्याचे सांगण्यात येत असल्याने त्यांना दंड आकारू न मुदत वाढ देणे क्रमप्राप्त होते असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. पाटबंधारे विभागाच्या अनास्थेमुळे मात्र बॅरेजची किंमत प्रचंड वाढली आहे.

२००९ मध्ये ज्यावेळी नेरधामणा बॅरेजचे काम सुरू झाले त्यावेळी १८५ कोटी रू पये किंमत होती तीन वर्षात हे बॅरेज बांधून पुर्ण करणे क्रमप्राप्त होते. पण २०११ ते २०१४ पर्यत निधीच नसल्याने काम बंद होते. या ९ वर्षात पंप हाऊसचे डिझाईन झाले नाही, मुख्य जलवाहीनीचे कामही जमीन उपलब्ध नसल्याने झाले नाही. या शिवाय महाराष्टÑ जलसंपती नियमन प्राधीकरणाने स्थगिती दिल्याने पाटबंधारे विभागाने मंजुरी देण्याचे टाळले परिणामी या बॅरेजच्या कामाची गती खुंटली. पाटबंधारे विभागाकडून होत असलेल्या अनेक तांत्रीक कामांच्या विलंबामुळे या बॅरेजची किंमत आजमितीस ६५० कोटींचा झाला आहे.
आताही हे काम संथगतीने सुरू असून,डीझाईनच नसल्याने संथगतीने होत असलेले पंप हाऊसचे काम पंधरा दिवसात बंद पडणार असल्याचे संकेत आहेत. शेतकºयांच्या शेतात सिंचनासाठी पाणी पुरविण्यासाठीच्या वितरण व्यवस्थेच्या कामाची तर अद्याप सुरू वातच झाली नाही.अद्याप या कामासाठीच्या निविदाच काढल्या नाहीत.या वितरण व्यवस्थेच्या भूमीगत जलवाहिनींचे कामही १०० ते १५० कोटींचे आहे.जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यानी २०१५ पासून आतापर्यंत वारंवार या बॅरेजला भेट दऊन पाहणी केलेली असून, प्रलंबीत कामे त्वरीत निकाली काढण्यासाठीच्या निरीक्षण टिपणी सुध्दा येथील पाटबंधारे मंडळ व विभागाला दिलेल्या आहेत.पंरतु याबाबत आतापर्यत या विभागाने कोणतेच पाऊल उचलले नसल्याचे वृत्त आहे.
दरम्यान,असे सर्व असताना २०१२ पासून सहा वर्ष कंत्राटदराला विना दंड मुदत वाढ देण्यात आली. या मागचे कारण काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.आणखी हे काम करणाºया कंत्राटदारास दंड आकारलेला नाही हे विशेष.
 

कंत्राटदराने काम बंद ठेवल्याने त्यास दंड आकारण्याची सुचना अकोला पाटबंधारे मंडळ अधिक्षक अभियंत्याला केलेली आहे.बॅरेजचे काम पुर्ण व्हावे,यासाठीचे आमचे प्रयत्न सुरू आहेत.
- संजय घाणेकर, मुख्य अभियंता, जलसंपदा, अमरावती.

Web Title: Nerdhamana barrage stuck in beurocrasy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.