अकोला : देशभर २०२० च्या मार्च महिन्यापासून कोरोनाचे नवीन संकट आले आहे. त्यामुळे अनेकांची नोकरी गेली, काहींचे व्यवसाय बंद पडले. त्यामुळे नाइलाजाने छोटी- मोठी गुन्हेगारी करणाऱ्या चोरट्यांचे नवीन चेहरे समोर आले आहेत. यावरून कोरोनाने पोलिसांची डोकेदुखी वाढविल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.
दरोडे, चोरी, लुटमार करताना जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटना वारंवार घडलेल्या आहेत. तशा प्रकारची नोंद पोलीस दप्तरी झालेली आहे. हे काम सराईत गुन्हेगारांकडून नेहमीच करण्यात येते. मात्र, कोरोनाचे संकट आल्यानंतर अनेकांचा रोजगार गेल्याने उदरनिर्वाह किंवा पैशांची चणचण दूर करण्यासाठी काही जण गुन्हेगारीकडे वळल्याचे वास्तव आहे. नवीन गुन्हेगारांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. पोलिसांचे खबरे, तसेच रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांवर पोलिसांची नजर आहे. मात्र, नवीन चोरट्यांनी तसेच गुन्हेगारांनी यामध्ये प्रवेश केल्याने पोलिसांनाही त्यांचा शोध लावणे मोठे आव्हानात्मक ठरले आहे. त्यामुळेच पोलिसांना आता त्यांचीही संख्या वाढवावी लागणार आहे.
शहरातील गुन्हेगारी
२०१९ -
२०२० -
२०२१ मेपर्यंत -
चोऱ्या, दरोडे -
खून -
जिवे मारण्याचा प्रयत्न -
गुन्हेगारीत नवीन चेहरे का आले?
आर्थिक तुटवडा दूर करण्यासाठी, तसेच काही जण कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी छोट्या- मोठ्या चोऱ्या करत असल्याची माहिती आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार काही दुचाकी चोरट्यांनी केवळ घरातील आर्थिक चणचण दूर करण्यासाठी चोऱ्या केल्याचे समोर आले आहे. यावरून कोरोनाच्या संकटाने अनेकांना गुन्हेगारीकडे वळविल्याचेही वास्तव आहे. या कारणामुळे गुन्हेगारीत नवीन चेहरे आल्याची माहिती आहे.
खबऱ्यांची संख्या वाढवावी लागणार
रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांवर पोलीस नजर ठेवून असतात, तसेच पोलिसांचे खबरी या गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवतात. ती माहिती पोलिसांना देतात. मात्र, नवीन गुन्हेगारांचा यामध्ये शिरकाव झाल्याने आता पोलिसांनाही खबऱ्यांची संख्या वाढवावी लागणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली, तर आता खबऱ्यांनाही त्यांचे काम पूर्वीपेक्षा बदलावे लागल्याचेही त्यांनी सांगितले.
केवळ आर्थिक चणचण भासली म्हणून गुन्हेगारी करणाऱ्यांची संख्या बोटावर मोजता येईल इतकीच आहे. मात्र, काहींचा पूर्वीचा काळ गुन्हेगाराच्या संगतीतील असेल किंवा तशा प्रकारची त्यांची वागणूक असेल, अशाच व्यक्ती गुन्हेगारीकडे वळल्याचे वास्तव आहे.
-विलास पाटील,
प्रमुख विशेष पथक
गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळणे याला काही घटनाही जबाबदार असतात. केवळ आर्थिक तुटवडा किंवा पैशाच्या कारणावरून घरात वाद होत असतील, तर काही जण संतापाने रागात गुन्हेगारीकडे वळल्याचे ऐकिवात आहे. मात्र, ही संख्या फार कमी आहे.
-सुजय पाटील,
मानसोपचारतज्ज्ञ अकोला