नवीन वाहतुक दंड आकारणी सोमवारपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 06:23 PM2019-09-01T18:23:33+5:302019-09-01T18:24:10+5:30
सोमवारपासून आता वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना चांगला भुर्दंड बसणार आहे.
अकोला - देशात नवीन वाहतुक दंड आकारणीस आजपासून प्रारंभ होणार आहे. त्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. पोलीस अधीक्षकांना डीजीटल सुचना पाठविण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षकांनीही ठाणेदारांना आवश्यक त्या सुचना केल्या असून सोमवारपासून आता वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना चांगला भुर्दंड बसणार आहे.
अत्याधुनीक मशीन्सव्दारे दंड आकारणी
नव्या कायद्यानुसार आता प्रत्येक वाहतूक पोलिसाला मायक्रोचीप लायसन्स रिडर मशिन्स देण्यात आल्या आहे. या मशिन्समध्ये प्रत्येक वाहन चालकाचे स्मार्टकार्ड लायसन्स आणि वाहनाचे आरसी कार्ड स्कॅन करण्याची सुविधा आहे. त्यामुळे तुमचे वाहन देशभरात कुठे, कितीवेळा आणि कशासाठी चालान झाले याची माहिती देशात कुठेही मिळू शकेल. या मशिन्समध्ये एटीएम कार्ड आणि क्रेडिट कार्ड स्वाइप करण्याची सुविधाही देण्यात आली आहे.
कोर्टात पाठविण्याचे कारण काय?
वाहन पकडल्यानंतर तुम्ही फाइन भरला की पोलिस लगेचच तुमचे वाहन सोडून देतात. परंतु कोटार्चे तसे नाही. कोर्टात फाइन भरण्यासाठी प्रसंगी एक पूर्ण दिवस लागतो किंवा अनेक तारखांवर हजर राहावे लागते. कोर्टात फाइन भरल्यानंतर लगेचच वाहन सोडण्यात येत नाही. त्यासाठी भरपूर कागदपत्र, अर्ज भरावे लागतात. त्यामुळे लोकांना अनेकदा कोर्टात चकरा माराव्या लागतात. लोकांना जोवर कोटार्चे झटके आणि फेºया माराव्या लागणार नाही, तोपर्यंत सतत वाहतूक नियम मोडणारे लोक सुधरणार नाही.
१. ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह : १० हजार
२. विना हेल्मेट : ५०० ते १५००
३. ट्रिपल सिट : ५०० रुपए
४. पीयूसी सर्टिफिकेट नसणे : ५०० रुपए
५. विना लायसन्स वाहन चालविणे : ५ हजार
६. जास्त वेगाने वाहन चालविणे : १ हजार
७. रॅश ड्रायव्हिंग : ५ हजार
८. वाहन चालविताना फोनवर बोलणे : १ ते ५ हजार
९. राँग साइड वाहन चालविणे : १ ते ५ हजार
१०. रेड लाइट जम्प : १ ते ५ हजार, दुसऱ्यांदा नियम मोडल्यास २ ते १० हजार
११. सीटबेल्ट न लावणे : १ हजार
१२. रूग्णवाहिका, पोलिस व्हॅन, फायर ब्रिगेडला पुढे जाऊ न देणे : १० हजार
१३. अल्पवयीन मुलाला वाहन चालविताना पकडल्यास : २५ हजार