महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई-नागपूरदरम्यान नऊ विशेष रेल्वे
By Atul.jaiswal | Published: November 25, 2023 06:32 PM2023-11-25T18:32:46+5:302023-11-25T18:32:49+5:30
प्राप्त माहितीनुसार, ०१२६२ नागपूर-मुंबई अनारक्षित विशेष रेल्वे ४ डिसेंबर रोजी नागपूर येथून २३.५५ वाजता निघेल
अकोला : महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने ४ ते ८ डिसेंबर या कालाचधीत मुंबई ते सेवाग्राम/अजनी/नागपूर दरम्यान नऊ विशेष रेल्वे फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. अप व डाऊन मार्गावरील या गाड्यांना अकोला स्थानकावर थांबा असणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, ०१२६२ नागपूर-मुंबई अनारक्षित विशेष रेल्वे ४ डिसेंबर रोजी नागपूर येथून २३.५५ वाजता निघेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला दुसऱ्या दिवशी १५.३० वाजता पोहोचेल. ०१२६४ नागपूर-मुंबई अनारक्षित विशेष ५ डिसेंबर रोजी नागपूर येथून ०८.०० वाजता निघेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे त्याच दिवशी २३.४५ वाजता पोहोचेल. ०१२६६ नागपूर-मुंबई अनारक्षित विशेष ५ डिसेंबर रोजी दि. ५.१२.२०२३ रोजी नागपूर येथून १५.५० वाजता निघेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १०.५५ वाजता पोहोचेल.
०१२४९ विशेष गाडी ६ डिसेंबर रोजी १६.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून निघेल आणि अजनी येथे दुसऱ्या दिवशी ०९.३० पोहोचेल. ०१२५१ विशेष गाडी ६ डिसेंबर रोजी १८.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून निघेल आणि सेवाग्राम येथे दुसऱ्या दिवशी १०.३० वाजता पोहोचेल. ०१२५३ विशेष गाडी ७ डिसेंबर रोजी (६ डिसेंबरच्या मध्यरात्री) दादर येथून ००.४० वाजता निघेल आणि अजनी येथे त्याच दिवशी १५.५५ वाजता पोहोचेल. ०१२५५ विशेष गाडी ७ डिसेंबर रोजी १२.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून निघेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०३.०० वाजता पोहोचेल. ०१२५७ विशेष गाडी ८ डिसेंबर रोजी १८.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून निघेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १२.१० वाजता पोहोचेल. ०१२५९ विशेष गाडी ८ डिसेंबर रोजी (७ डिसेंबरच्या मध्यरात्री) दादर येथून ००.४० निघेल आणि अजनी येथे त्याच दिवशी १५.५५ वाजता पोहोचेल.
या ठिकाणी थांबा
या गाड्यांना दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जलंब, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम, अजनी आणि नागपूर या स्थानकांवर थांबा असणार आहे.