जिल्हाधिकारी कार्यालयात राबविली ‘नो मास्क, नो एन्ट्री’ मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 06:06 PM2020-09-25T18:06:00+5:302020-09-25T18:06:34+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात १० नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून २ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला.
अकोला : जिल्हाधिकारी परिसरात येणारे नागरिक विना मास्क निष्काळजीपणे फिरत असताना दिसून येतात. याला आळा घालण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला अधिकारी व कर्मचारी यांचे पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात १० नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून २ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला.
कोविड-१९ चा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत असून, शहरी व ग्रामीण भागात रुग्णाच्या संख्येत सतत भर पडत आहे. कोविड-१९ चे संक्रमण कमी करण्यासाठी मास्क वापर करणे अनिवार्य आहे. तसेच सामाजिक अंतर ठेवून व वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ करणे तसेच सॅनिटायझरचा वापर करून या रोगाचे संक्रमण कमी करता येते. यासाठी ‘नो मास्क, नो एन्ट्री’ मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले होते. त्यानुसार पथक गठित करण्यात आले होते. या पथकात अधीक्षक मीरा पागोरे, नगर प्रशासन अधिकारी सुप्रिया टवलारे, वर्षा कुजाडे, स्नेहा गिरी गोसावी, थिटे सहभागी झाले होते.