वीजग्राहकांना मिटर रिडींग पाठविण्यासाठी आता पाच दिवसांची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 06:17 PM2020-09-08T18:17:24+5:302020-09-08T18:17:40+5:30

जार्मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी महावितरणला दिलेल्या निर्देशानुसार आता तब्बल पाच दिवसांच्या कालावधीपर्यंत वाढविण्यात आली आहे.

Now five days to send meter readings to power consumers | वीजग्राहकांना मिटर रिडींग पाठविण्यासाठी आता पाच दिवसांची मुदत

वीजग्राहकांना मिटर रिडींग पाठविण्यासाठी आता पाच दिवसांची मुदत

Next

अकोला : महावितरण कडून ग्राहकांच्या वीज मीटरचे नियमित रिडींग घेण्यात येते. ही प्रक्रिया सुरूच आहे.परंतु वीज बिल अधिक अचूक असावे आणि रिडींगची पडताळणी ग्राहकांना करता यावी म्हणून ग्राहकांना स्वत:च्या वीज मीटरचे रिडींग स्वत: सुलभतेने पाठविण्याची सुविधा महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना रिडींग कडे लक्ष ठेवून त्यानुसार वीज बिलाची,सदोष मीटरची तसेच वीज वापराची पडताळणी करता येणे शक्य आहे. ग्राहकांना स्वत:हून रिडींग पाठविण्यासाठी पूर्वी चार दिवसांची असलेली मुदत ऊजार्मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी महावितरणला दिलेल्या निर्देशानुसार आता तब्बल पाच दिवसांच्या कालावधीपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांनी अचूक बिलासाठी स्वत: रिडींग पाठवावे, असे आवाहन नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक (प्र.) सुहास रंगारी यांनी केले आहे.

कसे पाठवावे रिडींग?
सर्वप्रथम महावितरण मोबाईल अँप डाऊनलोड करणे तसेच ग्राहक क्रमांकासोबत हा मोबाईल क्रमांक महावितरणकडे नोंदणी असणे आवश्यक आहे. महावितरण मोबाईल अँप मध्ये 'सबमीट मीटर रिडींग'वर क्लिक केल्यास एकापेक्षा जास्त ग्राहक क्रमांक असल्यास ज्या क्रमांकाचे मीटर रिडींग पाठवायचे आहे, तो क्रमांक सिलेक्ट करावा. त्यानंतर मीटर क्रमांक नमूद करावा. मीटर रिडींग घेताना वीजमीटरच्या स्क्रिनवर तारीख व वेळेनंतर रिडींगची संख्या व केडब्लूएच असे दिसल्यानंतरच (केडब्लू किंवा केव्हीए वगळून) फोटो काढावा. त्यानंतर फोटोनुसार मन्यूअली रिडींग अँप मध्ये रिडींग नमूद करावे व सबमीट करावे. मोबाईल अँप मध्ये लॉगीन केल्यानंतर मीटर रिडींग थेट सबमीट करता येईल. मात्र गेस्ट म्हणून मीटर रिडींग सबमीट करताना नोंदणीकृत मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी क्रमांक नमूद करावा लागेल. ज्या ग्राहकांना संकेतस्थळावरून फोटो व मीटर रिडींग अपलोड करायचे आहे त्यांनी ग्राहक क्रमांकासोबत ग्राहक रजिस्ट्रेशन व लॉगीन करणे आवश्यक आहे.

हे आहेत फायदे
लघुदाब वीजग्राहकांनी दरमहा मीटर रिडींग व फोटो महावितरणकडे स्वत:हून पाठविल्यास त्यांना अनेक फायदे होणार आहे. ग्राहकांना स्वत:च्या मीटरकडे व रिडिंगकडे नियमित लक्ष राहील. तसेच वीजवापरावर देखील नियंत्रण राहील. रिडींगनुसार बिल आल्याची खात्री करता येईल. मीटर सदोष किंवा नादुरुस्त असल्यास त्याची तत्काळ तक्रार करता येईल. वीजबिलांबाबत कोणत्याही तक्रारी उद्भवणार नाहीत. रिडींग अचानक वाढल्यास त्याची कारणे शोधता येईल. या शिवाय शंका समाधानासाठी तक्रार करता येईल.

 

Web Title: Now five days to send meter readings to power consumers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.