आता यंत्राने काढता येईल धुऱ्यावरील तण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 05:53 PM2020-03-05T17:53:47+5:302020-03-05T17:54:04+5:30

डॉ. पंजाबराव देशमख कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाने नवे तण, गवत काप यंत्र तयार केले आहे.

Now weed can be removed with machine! | आता यंत्राने काढता येईल धुऱ्यावरील तण!

आता यंत्राने काढता येईल धुऱ्यावरील तण!

Next

- राजरत्न सिरसाट
अकोला: पिकातील तण ही शेतकऱ्यांना भेडसावणारी मोठी समस्या आहे. काही पिकातील तण जाळण्यासाठी बाजारात पीकनिहाय तणनाशके मोठ्या प्रमाणात आली आहेत; पण शेतरस्त्याच्या कडेचे तसेच शेताच्या धुºयावरील तण काढले जात नाही किंवा निर्मूलनही होत नाही. याच पृष्ठभूमीवर डॉ. पंजाबराव देशमख कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाने नवे तण, गवत काप यंत्र तयार केले आहे.
शेतकºयांची गरज बघून या कृषी विद्यापीठाने आतापर्यंत तीसच्यावर विविध यंत्रे विकसित केली आहेत. या यंत्राचा अवलंबदेखील होत आहे. यातील तूर डाळ गिरणीची मागणी शेतकºयांकडून होत आहे. शेताच्या धुºयावरील गवताचा प्रश्न अलीकडे मांडला जात आहे. कपाशीवरील गुलाबी बोंडअळी ही धुºयावरील दरवर्षी निघणारे गवत, लहान झाडे यावरही उपजीविका करीत असल्याचे समोर आले आहे. तणनाशकामुळे गवत जाळता येते. तथापि, इतर पिकांवर तणनाशक फवाºयातून पडल्यास पीकही जळण्याची भीती असते. याच अनुषंगाने कृषी विद्यापीठाने गवत काप यंत्र विकसित करू न शेतकºयांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ट्रॅक्टर चलित हे यंत्र असून, या यंत्रात ब्लेड लावण्यात आले आहेत. यामुळे जवळपास ४ ते १० सेमीपर्यंत या यंत्राने झाडे व गवत कापले जाते. या यंत्राचा फायदा रस्त्याच्या कडेचे गवत कापण्यासाठी होईल. महापालिका, जिल्हा परिषद, बांधकाम विभागांतर्गत रस्त्याच्या कडेचे गवत, छोटी झाडे कापण्यासाठी हे यंत्र उपयुक्त ठरणार आहे.
हे यंत्र विकसित करण्यात आले आहे. तथापि, त्याला जॉइंट अ‍ॅग्रोस्कोची मान्यता मिळवावी लागणार आहे. येत्या मे महिन्यात राज्यातील चारही कृषी विद्यापीठाचा जॉइंट अ‍ॅग्रोस्को अकोल्यात होणार आहे. यामध्ये हे यंत्र मान्यतेसाठी ठेवले जाणार आहे.


 शेतकºयांची गरज बघता गवत, तण काप यंत्र विकसित करण्यात आले आहे. हे यंत्र धुºयावरील तणासह रस्त्याच्या कडेचे गवत व छोटी झाडेही कापता येणार आहेत. जॉइंट अ‍ॅग्रोस्कोची मान्यता प्राप्त होताच प्रसार करण्यात येईल.
- डॉ. एस. एच. ठाकरे,
कृषी अभियांत्रिकी,
डॉ. पंदेकृवि, अकोला.

 

Web Title: Now weed can be removed with machine!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.