शहरात नागरिकांचे एकाच लसीकरण केंद्रातून मोहीम सुरू होती. शहराची लोकसंख्या जास्त असल्याने लसीकरण केंद्राची संख्या वाढविण्याची गरज होती. गर्दी झाल्याने संसर्गाचा धोका निर्माण होत आहे. गर्दीत नियमांचे पालन न केल्यास कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी शहरामध्ये लसीकरण केंद्र नगर परिषद शाळा क्रमांक दोन किंवा नगर परिषद जुने सभागृह या दोन केंद्रापैकी कोणतेही एक केंद्र वाढविण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष सचिन बारोकार यांनी केली होती. याची दखल घेत आरोग्य विभागाने नगर परिषद प्राथमिक मराठी शाळा क्रमांक एकमध्ये आणखी एक केंद्र सुरू केले आहे. आता शहरातील नागरिकांसाठी १८ ते ४४ वर्ष वयोगटासाठी एक लसीकरण केंद्र तसेच ४४ वर्षांवरील नागरिकांसाठी वेगळे लसीकरण केंद्राचे नियोजन केले आहे. निवेदन देताना भाजयुमोचे शहर अध्यक्ष सचिन बारोकार, आशुतोष सपकाळ, भारत फुलारी, अक्षय कवळे, दिनेश करपे, निलेश फुलारी, धीरज बंड, नितीन खंडारे, निरज कुटे आदी उपस्थित होते.
-------------
लसीकरण केंद्रात गर्दी वाढत असल्याने संसर्गाचा धोका वाढला होता. त्यामुळे आम्ही केंद्र वाढविण्याची मागणी केली. त्यानुसार, आरोग्य विभागाने लसीकरण केंद्र वाढविल्याने आभार.
-सचिन बारोकार, शहराध्यक्ष, भाजयुमो, पातूर.