अकोला : ओबीसी प्रवर्गाच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी स्वराज्य भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला. समता परिषद व जिल्हयातील इतर ओबीसी संघटनांना संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या मोर्चात आमदार हरिदास भदे, माजी आमदार तुकाराम बिरकड, माजी आमदार बळीराम शिरस्कार, प्रा. डॉ.संतोष हुशे, प्रकाश तायडे, महादेवराव हुरपुडे, ॲड. महेश गणगणे, अनिल शिंदे, मनपा विरोधी पक्ष नेते साजिद खान पठाण, सुभाष सातव सहभागी झाले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंंत्र्यांना पा ठविण्यात आले. यावेळी अनेकांनी काळया फिती लावून व घोषणांचे फलक हाती घेत जोरदार घोषणा दिल्या.
या आहेत मागण्या
निवेदनात ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी राज्य सरकारने उच्च व सर्वोच्च न्यायालयात सरकारच्या वतीने तज्ञ वकील नियुक्त करणे,ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणे,ओबीसी जात निहाय जनगणना करणे,उच्च शिक्षणाकरीता २७ टक्के आरक्षण,इतर प्रवर्गाप्रमाणे ओबीसी विदयार्थ्यांना १०० टक्के स्कॉलरशिप मिळाली पाहीजे, राज्य व केंद्र सरकारच्या नोकर भरती मध्ये प्रवर्गनिहाय २७ टक्के अधिकारी, कर्मचारी नेमावेत,ओबीसीचा अनुशेष पूर्ण करावा,तालूका व जिल्हा स्तरावर विदयार्थी-विदयार्थीनी स्वतंत्र वसतीगृह असावे,नॉनक्रिमीलेअर ची अट शिथील करावी,ओबीसी आरक्षणाची अंमलबाजवणी काटेकोर व्हावी आदी मागण्या नमूद करण्यात आल्या.
स्वराज्य भवनात सभा
स्वराज्य भवन प्रांगणात झालेल्या मार्गदर्शनात अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करीत ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्या शासनाने त्वरित सोडविण्याचे आवाहन केले.यावेळी अनिल शिंदे, प्रा.सदाशिव शेळके,धनंजय शिरस्कर,प्रा.विजय उजवणे,गजानन वाघमारे,सविकार,उमेश मसने,ज्योती भवाने,योगेश धानोरकर,परसराम उंबरकर,वसंतराव सोनोने,अतुल वसतकर,दिगंबर वाकोडे, गोपाल नागपुरे,मनीष हिवराळे,शंकरराव इंगळे,अनिल मावळे,गोपाल मोकलकर ,दिनकरराव नागे,अरविंद गाभने,निलेश राऊत,अजय चतारे,गजानन म्हैसने,महादेव मेहंगे,दिलिप पुसदकर,सुनील ढाकोळकर, रवी हेलगे,देविदास पोटे,अनिल मालगे,सदानंद भुस्कुटे,चक्रधर टाक,शिवाजी जव्युळकर, डॉ नवलकर ,महादेव साबे,प्रवीण ढोणे,जयंतराव फाटे समवेत बारा बलुतेदार संघ,कुणबी विकास मंडल,भावसार समाज, माळी युवा संघटन,कुंभार महासंघ,परीट महासंघ, कोळी संघटना,खोरीप,जय मल्हार सेनाचे प्रदेश पदाधिकारी,कार्यकर्ते व विविध समाजातील महिला पुरुष उपस्थित होते.