तहसिल कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या व्हायरल ‘आॅडिओ क्लिप’ ने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 02:25 PM2018-12-24T14:25:03+5:302018-12-24T14:26:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मंगरूळपीर : येथील तहसील अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या एका आॅडिओ क्लिपने जिल्हयात चांगलीच खळबळ उडाली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर : येथील तहसील अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या एका आॅडिओ क्लिपने जिल्हयात चांगलीच खळबळ उडाली असून, याबाबत आता मंगरुळपीर शहरात विविध प्रकारच्या चर्चा उघडपणे ऐकायला मिळत आहेत.परंतु ती क्लिप का सार्वजनिक झाली याच्यामागेही वेगळेच कारण असल्याची चर्चा जोर धरत असून अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या विरुध्द घडामोडींवरुन हे प्रकरण घडल्याचे दिसून येत आहे.
मागील आठवड्यात आम आदमी पक्षाने महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांवर आर्थिक देवाण घेवाणीचे गंभीर आरोप असलेले निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देऊन खळबळ माजवून दिली होती. यानंतर यांचे चांगलेच पडसाद उमटले. याबाबत काही राजकीय पक्षांनी अधिकाºयांच्या विरुद्ध तर काहींनी बाजूने निवेदन दिले. परंतु या प्रकरणाची सुरुवात करणाऱ्या आम आदमी पक्षाने निवेदन देऊन यास वाचा फोडली.मात्र आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या भावाचा रेतीचा व्यवसाय असून पकडलेला रेतीचा ट्रक सोडण्यासाठी आर्थिक देवाण घेवाणीतून वादाची ठिणगी पडल्याने हे प्रकरण पुढे वाढल्याची चर्चा होत आहे.
महसूलचा मंडळ अधिकारी व तहसीलदार यांचा वाहन चालक तसेच एका रेती व्यवसायिकांत आर्थिक देवाण घेवाणीतून वाद तसेच हाणामारी झाली. यानंतर मात्र रेती व्यावसायिकाने चिडून जाऊन याविषयी त्याच्याकडे असलेल्या आधीच्या व नंतरच्या आॅडिओ क्लिप सार्वजनिक केल्या. आता या क्लिपबाबत व राजकीय पक्षांनी यामध्ये घेतलेली उडी जिल्हयात चर्चेचा विषय ठरला आहे.
कोणत्याही शासकीय कार्यालयातील अधिकारी , कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचे आरोप-प्रत्यारोप झाले की त्यांची असलेली संघटना यासंदर्भात आवाज उठवितात. या प्रकरणात मात्र तसे झालेले दिसून येत नसल्याने उलट-सुलट चर्चेला जोर आला आहे. असे असले तरी राजकीय पक्षांनी मात्र यात उडी घेतलेली दिसून येत आहे.