...तर अधिकाऱ्यांना पिवळ््या रंगाचे पाणी पाजणार - शिवसेनेचा इशारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 01:36 PM2019-04-02T13:36:16+5:302019-04-02T13:36:51+5:30

अकोला: ऐन उन्हाळ््याच्या दिवसांत शहरवासीयांना पिवळ््या रंगाचा गढूळ पाणीपुरवठा करणाऱ्या मनपाच्या जलप्रदाय विभागाने अवघ्या दोन दिवसांत पाण्यावर तातडीने प्रक्रिया न केल्यास हेच पाणी संबंधित अधिकाऱ्यांना पाजणार असल्याचा सज्जड इशारा सोमवारी शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया, गटनेता राजेश मिश्रा यांनी दिला.

 ... the officials will drink yellow water - Shiv Sena's warning | ...तर अधिकाऱ्यांना पिवळ््या रंगाचे पाणी पाजणार - शिवसेनेचा इशारा 

...तर अधिकाऱ्यांना पिवळ््या रंगाचे पाणी पाजणार - शिवसेनेचा इशारा 

googlenewsNext


अकोला: ऐन उन्हाळ््याच्या दिवसांत शहरवासीयांना पिवळ््या रंगाचा गढूळ पाणीपुरवठा करणाऱ्या मनपाच्या जलप्रदाय विभागाने अवघ्या दोन दिवसांत पाण्यावर तातडीने प्रक्रिया न केल्यास हेच पाणी संबंधित अधिकाऱ्यांना पाजणार असल्याचा सज्जड इशारा सोमवारी शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया, गटनेता राजेश मिश्रा यांनी दिला. या मुद्यावर मनपाच्या स्थायी समिती सभागृहात आयुक्त संजय कापडणीस यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. सेनेच्या इशाºयाची तातडीने दखल घेत आयुक्त कापडणीस यांनी दुपारी जलप्रदाय विभागातील अधिकारी-कर्मचाºयांसह महान येथील जलशुद्धीकरण प्रकल्पावर धाव घेतली.
मागील तीन आठवड्यांपासून अकोलेकरांना पिवळ््या रंगाचा गढूळ पाणीपुरवठा होत आहे. महान धरणातील पाचवा व्हॉल्व्ह उघडल्यामुळे पिवळ््या रंगाचा पाणीपुरवठा होत असून, तो पिण्यायोग्य असल्याचा दावा जलप्रदाय विभागाकडून केला जात आहे. प्रत्यक्षात सदर पाण्याचा पिण्यासाठी वापर करणे शक्यच नसल्याचा प्रतिदावा अकोलेकर करीत आहेत. महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर प्रक्रिया करून शुद्ध पाणीपुरवठा का केला जात नाही,असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. याप्रकरणी लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यानंतर सोमवारी शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया, सेनेचे गटनेता राजेश मिश्रा, नगरसेवक मंगेश काळे, गजानन चव्हाण, शशिकांत चोपडे, नगरसेविका अनिता मिश्रा, प्रमिला गीते यांसह असंख्य शिवसैनिकांनी महापालिकेत धाव घेतली. यावेळी स्थायी समितीच्या सभागृहात आयुक्त संजय कापडणीस व जलप्रदाय विभागातील कर्मचाºयांसोबत चर्चा केली असता, सदर पाणी पिण्यायोग्य नसल्याचे समोर आले. पाणी अशुद्ध नाही तर तुम्ही पिऊन दाखवा, त्यानंतर आम्ही पितो, असे राजेश मिश्रा यांनी स्पष्ट केल्यानंतरही जलप्रदाय विभागातील कर्मचाºयांनी पाण्याला हातसुद्धा लावला नाही, हे विशेष. यावेळी युवासेना शहर प्रमुख नितीन मिश्रा, मनोज बाविस्कर, अभिषेक खरसाडे, संतोष रणपिसे, राजेश इंगळे, योगेश गीते, संजय अग्रवाल, अक्षय वानखडे, प्रमोद मराठे, आशीष पवार, तुकाराम मोरे, स्वप्निल अहिर आदींसह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

आयुक्तांनी केली पाहणी
गढूळ पाणीपुरवठ्याची दखल घेत सायंकाळी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी जलप्रदाय विभागातील कर्मचाºयांसह महान येथील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. जलशुद्धीकरण केंद्रावरील तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. येत्या तीन दिवसांत गढूळ पाणीपुरवठ्याची समस्या दूर होणार असल्याची माहिती आहे.



अधिकारी दिशाभूल करतात!
जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे पाण्याच्या मुद्यावर दिशाभूल करीत असल्याचा आरोप आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी केला. आयुक्त साहेब, ऐन उन्हाळ््यात अशा गढूळ पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना कावीळ होण्याची शक्यता आहे. यावर त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश आ. बााजोरियांनी दिले.


प्रा. अंजली आंबेडकर यांनी केली पाहणी
शहरवासीयांना गढूळ पाणीपुरवठा होत असल्याची दखल घेत वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी सोमवारी महान येथील जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यासंदर्भात त्यांनी आयुक्त संजय कापडणीस यांच्यासोबत भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली.

 

Web Title:  ... the officials will drink yellow water - Shiv Sena's warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.