लेटलतिफ ११ अधिकाऱ्यांची एक दिवसाची वेतन कपात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 10:45 AM2020-09-14T10:45:59+5:302020-09-14T10:46:06+5:30
सप्टेंबर महिन्यातील वेतनातून एक दिवसाची वेतन कपात करण्यात येणार आहे.
अकोला : नियोजित वेळेपेक्षा कार्यालयात उशिरा येणाºया जिल्हा परिषदेच्या लेटलतिफ ११ प्रशासन अधिकाऱ्यांच्या वेतनातून एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सौरभ कटियार यांनी ९ सप्टेंबर रोजी दिला. त्यानुसार संबंधित प्रशासन अधिकाºयांच्या सप्टेंबर महिन्यातील वेतनातून एक दिवसाची वेतन कपात करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी ३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास जिल्हा परिषद परिसरातील समाजकल्याण, लघुसिंचन, पशुसंवर्धन, महिला बालकल्याण, सामान्य प्रशासन, पंचायत, बांधकाम, कृषी, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, अर्थ इत्यादी इत्यादी विभागांच्या कार्यालयांना भेट देऊन पाहणी केली होती. त्यामध्ये कार्यालयात नियोजित वेळेपेक्षा उशिरा येणाºया अधिकारी व कर्मचाºयांची माहिती घेण्यात आली. त्यामध्ये विविध विभागातील ११ सहायक प्रशासन अधिकारी व कनिष्ठ प्रशासन अधिकारी आणि विविध संवर्गातील ९७ कर्मचारी कार्यालयात नियोजित वेळेपेक्षा उशिरा आल्याचे आढळून आले होते. कार्यालयात उशिरा येणाºया १०८ अधिकारी व कर्मचाºयांना मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी त्याच दिवशी सायंकाळी कारणे दाखवा (शो-कॉज) नोटीस बजावली होती. त्यापैकी कार्यालयात उशिरा येणाºया जिल्हा परिषदेच्या ११ सहायक प्रशासन अधिकारी व कनिष्ठ प्रशासन अधिकाºयांच्या वेतनातून एक दिवसाची वेतन कपात करण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी दिला. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील ११ प्रशासन अधिकाºयांच्या सप्टेंबर महिन्यातील वेतनातून एक दिवसाच्या वेतनाची कपात जिल्हा परिषद प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.
निर्धारित वेळेपेक्षा कार्यालयात उशिरा आल्याचे आढळून आलेल्या जिल्हा परिषदेच्या ११ सहायक प्रशासन अधिकारी व कनिष्ठ प्रशासन अधिकाºयांच्या वेतनातून एक दिवसाची वेतन कपात करण्याचा आदेश दिला आहे.
- सौरभ कटियार
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद