सर्वोपचार रुग्णालयातील दोनपैकी एक डायलिसिस मशीन बंद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:15 AM2021-01-14T04:15:42+5:302021-01-14T04:15:42+5:30
सीटी स्कॅन मशीनही अधूनमधून बंद डायलिसिसपेक्षा जास्त सिटी स्कॅनसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. या मशीनवरील भार वाढल्यास हे ...
सीटी स्कॅन मशीनही अधूनमधून बंद
डायलिसिसपेक्षा जास्त सिटी स्कॅनसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. या मशीनवरील भार वाढल्यास हे मशीनही अधूनमधून बंद पडत असल्याचे दिसून येते. कोविडच्या गंभीर रुग्णांचे सिटी स्कॅनही याच मशीनवर केले जात असल्याने सर्वसामान्य रुग्णांसाठी हे मशीन जवळपास तीन ते चार तास बंद ठेवले जात असल्याची माहिती आहे. निर्जंतुकीकरणानंतर या मशीनचा इतर रुग्णांसाठी वापर केला जातो. त्यामुळे रुग्णांना सीसी स्कॅनसाठी ताटकळत बसावे लागते. अनेकदा रुग्णांना सीटी स्कॅनसाठी सर्वोपचार रुग्णालयात चकरा माराव्या लागतात.
सर्वोपचार रुग्णालयातील डायलिसिस मशीन बंद असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. दुसरे मशीन सुरू असले, तरी ते कोविड वॉर्डजवळ असल्याने रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या संदर्भात अधिष्ठाता यांच्याकडे वारंवार निवेदनही दिले असून, ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाइन तक्रारही दिली आहे. तरी अद्यापही हे मशीन सुरू झालेले नाही.