अकरावी विज्ञान शाखेसाठी ऑनलाइन प्रवेश उद्यापासून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 10:25 AM2020-08-10T10:25:52+5:302020-08-10T10:25:57+5:30

प्रवेश प्रक्रिया शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांच्या मार्गदर्शनात ११ आॅगस्टपासून राबविण्यात येणार आहे.

Online admission for 11th science branch from tomorrow! | अकरावी विज्ञान शाखेसाठी ऑनलाइन प्रवेश उद्यापासून!

अकरावी विज्ञान शाखेसाठी ऑनलाइन प्रवेश उद्यापासून!

Next

अकोला : कोरोना प्रादुर्भावाचा फटका शिक्षण क्षेत्रालासुद्धा बसला आहे. इयत्ता दहावीचा निकाल लागल्यामुळे प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने आॅनलाइन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इयत्ता अकरावी विज्ञान शाखेची आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांच्या मार्गदर्शनात ११ आॅगस्टपासून राबविण्यात येणार आहे.
यंदा दहावी ९५.५२ टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश घेण्याची घाई असून, त्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने ११ आॅगस्टपासून विज्ञान शाखेची प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी एचटीटीपी://सीएओअकोला.इन ही वेबसाइट तयार करण्यात आली आहे. या वेबसाइटवरून घरबसल्या मोबाइलवरसुद्धा प्रवेश निश्चित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना १0 ते १७ आॅगस्टपर्यंत कॅम्पस प्रवेश, ११ ते २0 आॅगस्टपर्यंत आॅनलाइन प्रवेश अर्ज भरता येईल. २५ आॅगस्ट रोजी प्रथम प्रवेश यादी जाहीर होईल. २६ ते ३१ आॅगस्टदरम्यान कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्याची मुदत, २७ ते ३१ आॅगस्टपर्यंत व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेण्याची मुदत, २ सप्टेंबर रोजी दुसऱ्या फेरीसाठी प्रवेश प्रक्रियेबाबतची घोषणा करण्यात येईल. विद्यार्थ्यांना १00 प्रवेश प्रक्रिया शुल्क प्रवेश घेणाºया कनिष्ठ महाविद्यालयात जमा करावे. आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क भरावे लागणार नाही. विद्यार्थ्यांना काही अडचण आल्यास, त्यांनी जि.प. आगरकर विद्यालय येथील समिती कार्यालयात दुपारी २ ते सायंकाळी ५.३0 पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, प्रवेश प्रक्रिया समितीचे अध्यक्ष डॉ. विजय नानोटी, सचिव गजानन चौधरी, डॉ. अविनाश बोर्डे यांनी केले आहे.

Web Title: Online admission for 11th science branch from tomorrow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.