लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाईन नावनोंदणी

By admin | Published: August 11, 2014 11:59 PM2014-08-11T23:59:42+5:302014-08-12T00:12:39+5:30

शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स) मिळविण्याकरिता द्याव्या लागणार्‍या परीक्षेसाठी आता उमेदवारांना ऑनलाईन नाव नोंदणी (अपाईंटमेंट) करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

Online Enrollment for Learning Licenses | लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाईन नावनोंदणी

लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाईन नावनोंदणी

Next

वाशिम : शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स) मिळविण्याकरिता द्याव्या लागणार्‍या परीक्षेसाठी आता उमेदवारांना ऑनलाईन नाव नोंदणी (अपाईंटमेंट) करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. या सुविधेचा शुभारंभ वाशिम येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात १४ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. मोटार वाहन कायद्यानुसार लर्निंग लायसन्स मिळविण्याकरिता ऑनलाईन चाचणी परिक्षा द्यावी लागते. त्यासाठी कार्यालयामध्ये नागरिकांची मोठी गर्दी होते. नागरिकांना कार्यालयात उपस्थित राहून तासनतास ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे वेळ तसेच ङ्म्रम वाया जातात. बरेचवेळा नागरिकांचा दिवस खर्ची पडतो. त्यामुळे नागरिकांच्या सोईकरिता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, वाशिम येथे १४ ऑगस्ट पासून शिकाऊ अनुज्ञप्तीकरिता ऑनलाईन अपॉइनमेंट ही सुविधा सुरु करण्यात येत आहे. या सुविधेमुळे इच्छुक उमेदवार शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणीकरिता आपल्या सोईनुसार दिवस व वेळ निवडू शकतील. यामुळे नागरिकांना परिवहन कार्यालयात तासंतास रांगेत उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही. ङ्म्रम व वेळेची बचत होईल. एका दिवसाला सात उमेदवारांना नोंदणी करता येईल. लर्निंग लायसन्स मिळविण्यासाठी ऑनलाईन वेळ मिळण्याची संधी वाशिमच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने उपलब्ध करुन दिली आहे. सकाळी १0 ते ११, ११ ते १२, दुपारी १२ ते १ व दुपारी १ ते २ अशा चार वेळच्या कालावधीत मध्ये परिक्षा देण्याचा पर्याय निवडता येईल. या सुविधेमुळे अर्जदारांची होणारी दमछाक टळणार आहे.

Web Title: Online Enrollment for Learning Licenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.