सस्ती प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पाच गावांत कोरोनाचा उद्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:12 AM2021-03-29T04:12:52+5:302021-03-29T04:12:52+5:30
खेट्री : पातूर तालुक्यातील सस्ती प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गेल्या काही दिवसापासून पाच गावांमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. यामध्ये ...
खेट्री : पातूर तालुक्यातील सस्ती प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गेल्या काही दिवसापासून पाच गावांमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. यामध्ये सस्ती, पिंपळखुटा, दिग्रस, चतारी, सुकळी गावांचा समावेश आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. खबरदारी म्हणून स्थानिक प्रशासनाने वेळीच दखल घेऊन ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सस्ती २८, पिंपळखुटा २३, दिग्रस १७, चतारी १६, सुकळी ८, अशी कोरोना पॉझिटिव्ह संख्येत वाढ झाली आहे. पातूर तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने ही पाच गावे कोरोनाची हॉटस्पॉट बनली आहेत. सस्ती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश गाडगे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. मुबशीर खान, आरोग्य सेवक राजेश मानकर, आरोग्य सेविका अनिता चोरमारे यांनी पॉझिटिव्ह रुग्णांना होम क्वारंटाईन केले असून, या पाच गावांमध्ये दोन वेळा रॅपिड टेस्ट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पॉझिटिव्ह रुग्णांनी घरा बाहेर निघू नका, तोंडाला मास्क लावा, वारंवार हात धुवा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. परंतु अजूनही काही नागरिक निष्काळजी करीत आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली
कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रत्येक गावांमध्ये समिती गठित केली आहे. सदर समितीचा अध्यक्ष सरपंच आहे. या गावामध्ये समितीकडून कोरोना नियंत्रणासाठी प्रयत्न केले जात नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे.