शिर्डीच्या साईबाबा शताब्दी वर्षानिमित्त ४ फेब्रुवारीपासून विदर्भात पादुका दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 08:45 PM2017-12-10T20:45:10+5:302017-12-10T20:56:17+5:30
अकोला : शिर्डीच्या साईबाबा शताब्दी वर्षानिमित्त संस्थानने पंचसूत्री कार्यक्रम राबविला असून, यानिमित्त साईबाबांच्या मूळ पादुका भाविकांच्या दर्शनासाठी देशभरात फिरविल्या जाणार आहेत. या पादुका ४ फेब्रुवारीपासून विदर्भात येत असून, त्यानिमित्त भरगच्च कार्यक्रम ठेवले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शिर्डीच्या साईबाबा शताब्दी वर्षानिमित्त संस्थानने पंचसूत्री कार्यक्रम राबविला असून, यानिमित्त साईबाबांच्या मूळ पादुका भाविकांच्या दर्शनासाठी देशभरात फिरविल्या जाणार आहेत. या पादुका ४ फेब्रुवारीपासून विदर्भात येत असून, त्यानिमित्त भरगच्च कार्यक्रम ठेवले आहेत. अशी माहिती शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आणि प्रख्यात बिल्डर्स सुरेश हावरे यांनी अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेतून दिली. शेगावच्या संत गजानन महाराज संस्थानच्या धर्तीवर सेवाभावी उपक्रम राबविणार असल्याचेही हावरे यांनी सांगितले.
साई भक्तांचा मोठा गोतावळा असून, आठ हजार मंदिरे देशात आणि ४७ मंदिरे विदेशात आहेत. शताब्दी वर्षानिमित्त तीन हजार कोटींचा विकास आराखडा प्रस् तावित आहे. तिरुपती आणि शेगावच्या धर्तीवर शिर्डी संस्थानने आता पंचसूत्री कार्यक्रम हाती घेतला आहे. धार्मिक, सामाजिक, प्रबोधनात्मक, सांस्कृतिक आणि पादुका दर्शनाचा हा कार्यक्रम आहे. त्यासाठी विदर्भातही पादुका दर्शन आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. अमरावती येथे ४ फेब्रु., अकोला ये थे ५ फेब्रु., खामगाव येथे ६ फेब्रु. आणि शेगाव येथे ७ फेब्रुवारी रोजी पादुका दर्शनासाठी उपलब्ध राहतील. त्यानिमित्त अकोल्यातील पंचसूत्री कार्यक्रम अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले. वर्षाला चारशे कोटींची देणगी येत असलेल्या शिर्डी संस्थानने आता दररोज सहा हजार भाविकांची संगणकीय नोंदणी सुरू केली आहे. सोबतच भविष्यात मेडिटेशन, सायन्स पार्क, साई महिमांचे विविध उपक्रम प्रस्तावित आहेत, त्याची माहितीही त्यांनी येथे दिली. राज्यात ५00 साई अँम्बुलन्स दिल्या जाणार असून, १५0 अँम्बुलन्सचे दाते झाले आहेत. या प्रयोगासोबत पशूसांठीदेखील अँम्बुलन्स सेवा देण्याचा विचार आहे, असेही ते म्हणालेत.