अपघातांचा ‘टक्का’ घसरणार!

By admin | Published: August 12, 2014 12:32 AM2014-08-12T00:32:02+5:302014-08-12T00:32:02+5:30

लर्निंग लायसन्साठी ऑनलाईन परिक्षा: वाहतूकीचे नियम ज्ञात असणार्‍यांनाच मिळतेय परवाना

'Percentage of Accidents will be reduced! | अपघातांचा ‘टक्का’ घसरणार!

अपघातांचा ‘टक्का’ घसरणार!

Next

वाशिम : राज्यात दिवसागणिक वाढत असलेल्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी प्रयत्नरत असणार्‍या परिवहन विभागाने आता वाहन चालविण्यासाठी देण्यात येणार्‍या शिकावू परवान्यासाठी ऑनलाईन परिक्षा घेणे सुरू केले आहे. वाहतूकीच्या नियमांसह सामान्य ज्ञानाची यामध्ये उजळणी होणार असल्यामुळे अपघातांचा आलेख घटण्यास मदत होणार आहे.
राज्यात आजवर शिकावू वाहनचालक परवाना मिळविण्याची प्रक्रिया सोपी होती. रहिवाशी दाखला व ओळखीचे प्रमाणपत्रासह अर्ज करणार्‍यांना परिवहन विभाग परवाना देऊन टाकत होते. अनेकवेळा तर परवाना मागणार्‍याला वाहतूकीचे नियम ज्ञात आहेत अथवा नाही याचीही शहानिशा करण्यात येत नव्हती. यातूनच राज्यात रस्ते अपघातांचा आलेख वाढत चालला होता. याला आळा घालण्यासाठी आता परिवहन विभागाने परवाना मागणार्‍या उमेदवारांची ऑनलाईन परिक्षा घेण्यास सुरूवात केली आहे. युनायटेड टेलीकॉम लिमीटेड या खासगी कंपनीला परिक्षेचे कंत्राट देण्यात आले आहे. उमेदवार मोटार वाहन निरिक्षक कक्षात हजर झाल्यानंतर त्याची शारिरिक चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर कागद पत्रांची पडताडणी, बायोमेट्रीक्स छायाचित्र आदी सोपस्कार पार पडल्यानंतर त्यांची संगणकावर ऑनलाईन परिक्षा घेण्यात येणार आहे. १५ गुणांच्या असलेल्या या परिक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी नऊ गुण मिळविणे आवश्यक असुन उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच शिकावू परवाना प्रदान करण्यात येणार आहे. या परिक्षेमुळे उमेदवारांची वाहतूकीच्या नियमांची उजळणी होत आहे.

** लर्निग लायसन्स काढण्यासाठी आता संबधित उमेदवारांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात स्वत: हजर राहून कायदेशिर सोपस्कार पार पाडावे लागतात.यामध्ये त्यांचा वेळ व श्रमाचा अपव्यय होता. नेमकी हीच बाब टाळण्यासाठी परिवहन विभागाने आता ऑनलाईन अर्ज स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे. वाहन चालविण्याचा शिकावू परवान्यासाठी आता ऑनलाईन अर्ज करणार्‍या उमेदवाराला ऑनलाईन तारिख व वेळ देण्यात येणार आहे. त्यानंतर या मोटार वाहन निरिक्षकांकडुन त्याची परिक्षा घेण्यात येणार आहे.परिक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना परवाना देण्यात येणार आहे.

** ज्या उमेदवाराकडे पूर्वीचे कुठलाही वाहन चालविण्याच परवाना असेल त्या उमेदवाराला या ऑनलाईन परिक्षेतून सुट देण्यात आली आहे. त्यामुळे सदर परिक्षा उत्तीर्ण होणार्‍यांच्या संख्येत अश्या सुट मिळविलेल्या उमेदवारांचाच भरणा अधिक असल्याची माहीती प्रादेशिक परिवहन विभागाच्या सुत्राकडुन मिळाली आहे.

Web Title: 'Percentage of Accidents will be reduced!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.