दोन वन्यप्राणी काळविटास फिजिकल रेस्क्यू करून दिले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:19 AM2021-05-20T04:19:00+5:302021-05-20T04:19:00+5:30
अकोला : तेल्हारा तालुक्यातील खंडाळा या गावातील शेत शिवारामध्ये पाणीपुरवठ्याच्या पाईप लाईनमध्ये दोन काळवीट अडकल्यानंतर वन विभाग व वन्यजीव ...
अकोला : तेल्हारा तालुक्यातील खंडाळा या गावातील शेत शिवारामध्ये पाणीपुरवठ्याच्या पाईप लाईनमध्ये दोन काळवीट अडकल्यानंतर वन विभाग व वन्यजीव विभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवून या दोन काळविटांना जीवदान दिले.
के.आर. अर्जुना उपवनसंरक्षक, सु.अ. वडोदे सहाय्यक वनसंरक्षक (वने) वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली अकोट वन्यजीव क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या अकोट वर्तुळ क्षेत्रातील ए.एन. बावणे वन परिमंडळ अधिकारी अकोट वर्तुळ यांचे अधिनस्त वनकर्मचारी सी.एम. तायडे, वनरक्षक बोर्डी बिट व ए.पी. श्रीनाथ वनरक्षक शहानुर, विकास मोरे, सोपान रेळे, राहुल बावणे, दीपक मेसरे, वनकर्मचारी अकोट वर्तुळ यांनी मिळून मौजा खंडाळा येथील शेतशिवारात वन्यप्राण्यामध्ये सुरू असलेल्या टक्करमध्ये शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी लावण्यात आलेल्या ठिबक सिंचनच्या नळ्यांमध्ये अडकलेल्या दोन वन्यप्राणी काळविटास गावकऱ्यांच्या मदतीने सुरक्षित रेस्क्यू करून जीवदान दिले. या काळविटाना मेळघाट बफर झोन क्षेत्रातील जंगलाच्या दिशेने सुखरूप सोडण्यात आले.