अकोल्यात 'पीएम' आवास योजनेला राजकारण्यांचा अडथळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 09:23 AM2017-11-30T09:23:06+5:302017-11-30T09:31:35+5:30

अकोल्यातील जुने शहरातील शिवसेना वसाहत व मातानगरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचे काम व्यवस्थितरीत्या सुरू असताना योजनेच्या अंमलबजावणीला काही राजकीय पदाधिकारी अडथळा निर्माण करीत असल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेविका सपना नवले यांनी केला आहे.

'PM' housing scheme is a barrier to politics! | अकोल्यात 'पीएम' आवास योजनेला राजकारण्यांचा अडथळा!

अकोल्यात 'पीएम' आवास योजनेला राजकारण्यांचा अडथळा!

Next
ठळक मुद्देशिवसेना नगरसेविकेचा आरोपप्रभारी आयुक्तांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जुने शहरातील शिवसेना वसाहत व मातानगरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचे काम व्यवस्थितरीत्या सुरू असताना योजनेच्या अंमलबजावणीला काही राजकीय पदाधिकारी अडथळा निर्माण करीत असल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेविका सपना नवले यांनी केला आहे. सदर राजकीय हस्तक्षेप थांबवण्याची मागणी करीत नगरसेविका सपना नवले, नगरसेवक शशीकांत चोपडे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी बुधवारी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांना निवेदन सादर केले.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून जुने शहरातील शिवसेना वसाहत, मातानगरमध्ये घरांचे बांधकाम केले जात आहे. ३२१ चौरस फूट घरासाठी शासनाकडून अडीच लाख रुपयांचे अनुदान असून, उर्वरित सव्वालाख रुपयांचा हिस्सा लाभार्थींना जमा करावा लागत आहे. पात्र लाभार्थींची परिस्थिती पाहता पैशांची तडजोड करून आपल्या स्वप्नातील घर पूर्ण होण्याची वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत योजनेच्या अंमलबजावणीत स्थानिक राजकीय पदाधिकारी हस्तक्षेप करीत असल्यामुळे या प्रकल्पाचे कामकाज मंदावल्याचे नगरसेविका सपना नवले व शशी चोपडे यांनी निवेदनात नमूद केले आहे. अशा राजकारण्यांचा त्वरित बंदोबस्त करून, घरांचे बांधकाम पूर्ण करण्याची मागणी प्रभारी आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी अश्विन नवले यांच्यासह शिवसेना वसाहतमधील नागरिक उपस्थित होते.

Web Title: 'PM' housing scheme is a barrier to politics!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.