लाचखोर जिल्हा उपनिबंधकासह विक्रीकर च्या सहायक आयुक्तास पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 07:26 PM2020-07-10T19:26:04+5:302020-07-10T19:26:28+5:30
टक केल्यानंतर शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने दोन्ही आरोपीस १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
अकोला : अकोट बाजार समितीच्या सचिवांसह त्यांच्या अधिनस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करण्यासाठी तसेच थकबाकी रकमेच्या प्रस्तावास मान्यता देण्यासाठी जिल्हा उप-निबंधक डॉ. प्रवीण लोखंडे याने त्याचा लाचखोर साथीदार तसेच विक्रीकर विभागाचा सहायक आयुक्त अमरप्रीत सिंग सेठी याच्यामार्फत गुरुवारी दोन लाख रुपयांची लाच स्वीकारली. या दोघांनाही अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्यानंतर शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने दोन्ही आरोपीस १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
सहकार विभागाचा जिल्हा उप-निबंधक डॉ. प्रवीण लोखंडे व विक्रीकर विभागाचा सहायक आयुक्त अमरप्रीत सिंग सेठी या दोघांनी अकोट बाजार समितीच्या सचिवांसह त्यांच्या अधिनस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करण्यासोबतच थकबाकी रकमेच्या प्रस्तावास मान्यता देण्यासाठी जिल्हा उप-निबंधक डॉ. प्रवीण लोखंडे याने विक्रीकर विभागाचा सहायक आयुक्त अमर सेठी याच्यामार्फत पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १० जून रोजी तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता, त्यामध्ये हे दोघे अडकले. अमर सेठी याच्या महाजनी प्लॉट येथील घरात लाच घेताना अटक करण्यात आली होती. तत्पूर्वी जिल्हा उप-निबंधक प्रवीण लोखंडे आणि अमर सेठी या दोघांनी तक्रारकर्त्याकडून घेतलेली दोन लाख रुपयांच्या लाचेची रक्कम परत केली; मात्र पंचासमक्ष केलेल्या दोन वेळच्या पडताळणीत ५ लाखांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते, तसेच लाचेची रक्कमही स्वीकारली होती. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या दोन्ही लाचखोरांना तातडीने अटक केली. त्यानंतर या दोघांवरही रामदास पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने दोन्ही आरोपींना १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.