लाचखोर पुरवठा निरीक्षकास पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:18 AM2021-04-10T04:18:37+5:302021-04-10T04:18:37+5:30

अकोला : बोरगाव मंजू येथील एका स्वस्त धान्य दुकानदारास ५ हजार ५०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अकोला तहसील कार्यालयातील पुरवठा ...

Police custody to bribery supply inspector | लाचखोर पुरवठा निरीक्षकास पोलीस कोठडी

लाचखोर पुरवठा निरीक्षकास पोलीस कोठडी

Next

अकोला : बोरगाव मंजू येथील एका स्वस्त धान्य दुकानदारास ५ हजार ५०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अकोला तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक नीलेश कळसकर यास अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

अकोला तहसील कार्यालयातील अन्न नागरी पुरवठा विभागात पुरवठा निरीक्षक म्हणून कार्यरत असलेला नीलेश भास्कर कळसकर (वय ३२) याने बोरगाव मंजू येथील स्वस्त धान्य दुकानदाराने त्याच्या दुकानातून कोरोना काळात वाटप झालेल्या धान्याचे शासनाने मंजूर केलेल्या अंदाजे ५५ हजार रुपयांच्या निधीचा धनादेश देण्यासाठी दहा टक्के याप्रमाणे म्हणजे ५ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली; मात्र तक्रारकर्त्यास लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ६ एप्रिल रोजी पडताळणी केली असता लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पंचांसमक्ष केलेली कारवाई नीलेश कळसकर याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यास अटक केली. आरोपीस गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Web Title: Police custody to bribery supply inspector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.