अकोला : डिसेंबर २0१८ अखेरपर्यंत रिक्त होणाºया संभाव्य पदांची गणना करून जाहीर करण्यात आलेल्या ६८ जागांवर लवकरच पोलीस शिपाई पदासाठी अकोला पोलीस दलाच्यावतीने भरती करण्यात येणार आहे. यात सर्वाधिक ४२ जागा खुल्या प्रवर्गातील आहेत.अंतिम निवड यादीतील प्रवर्गनिहाय गुणवत्ता क्रमानुसार येणाºया उमेदवारांना या घटकाच्या आस्थापनेवर पदे रिक्त होतील. त्यानुसार प्रवर्गनिहाय उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल. निवड यादीतील उमेदवारांची निवड तात्पुरती राहील. इच्छुक उमेदवारांनी ६ ते २८ फेब्रुवारीदरम्यान रात्री १२ वाजेपर्यंत आॅनलाइन अर्ज भरावेत. उमेदवारांसाठी महापोलीस.महाआॅनलाईन.जीओव्ही.ईन या संकेतस्थळावर भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोलीस शिपाई पदासाठी २८ फेब्रुवारी २0१८ रोजी कमीत कमी १८ वर्ष पूर्ण आणि जास्तीत जास्त २८ वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांसाठी जास्तीत जास्त ३३ वर्ष) वयोमर्यादा असावी. पोलीस शिपाई पदासाठी ४२ जागा खुल्या प्रवर्गातील आहेत. उर्वरित अजा ३, भज (ब) १, विमाप्र १0, इमाव १२ जागा रिक्त आहेत. या जागा सर्वसाधारणसाठी १३, महिलासाठी १३, खेळाडू २, प्रकल्पग्रस्त २, भूकंपग्रस्त १, माजी सैनिक ६, अंशकालीन पदवीधर २, पोलीस पाल्य १, होमगार्डसाठी २ अशा ४२ जागा राखीव आहेत. भरतीदरम्यान शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा होईल. उमेदवारांनी अर्जात अचूक माहिती द्यावी. चुकीची माहिती दिल्यास उमेदवाराचा अर्ज कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल. शारीरिक व लेखी चाचणीनंतर ज्या उमेदवारांची निवड होईल. त्यांचीच सर्व कागदपत्रे तपासण्यात येतील. निवड झालेल्या उमेदवारांकडे योग्य कागदपत्रे नसतील, तर ते अपात्र ठरतील, अशी माहिती पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी दिली. (प्रतिनिधी)
अकोल्यात लवकरच ६८ जागांसाठी पोलीस भरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 1:48 PM
अकोला : डिसेंबर २0१८ अखेरपर्यंत रिक्त होणाºया संभाव्य पदांची गणना करून जाहीर करण्यात आलेल्या ६८ जागांवर लवकरच पोलीस शिपाई पदासाठी अकोला पोलीस दलाच्यावतीने भरती करण्यात येणार आहे. यात सर्वाधिक ४२ जागा खुल्या प्रवर्गातील आहेत.
ठळक मुद्दे इच्छुक उमेदवारांनी ६ ते २८ फेब्रुवारीदरम्यान रात्री १२ वाजेपर्यंत आॅनलाइन अर्ज भरावेत. पोलीस शिपाई पदासाठी ४२ जागा खुल्या प्रवर्गातील आहेत. भरतीदरम्यान शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा होईल.