अकोला: मतदार जनजागृती व एसव्हीईईपी कार्यक्रमांतर्गत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेची ओळख व्हावी, विद्यार्थ्यांमार्फत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये पक्ष्यांविषयी जागृती व्हावी व त्यामधून पर्यावरण संवर्धनाचे संस्कार व्हावे, या उद्देशाने अकोला जिल्हा निवडणूक अधिकारी निसर्गकट्टा व निसर्गप्रेमी संस्था यांच्यावतीने शहर पक्षी निवडणुकीचे आयोजन केले. निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानाला १५ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय, मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालय, खंडेलवाल इंग्लिश स्कूल, राजेश्वर कॉन्व्हेंट, मांगीलाल शर्मा विद्यालय, संताजी कॉन्व्हेंट, समता विद्यालय, सन्मित्र पब्लिक स्कूल, आगरकर विद्यालय, न्यू ईरा हायस्कूल, न्यू इंग्लिश हायस्कूल, जिजाऊ कन्या विद्यालय, लिटिल स्टार कॉन्व्हेंट, शिवाजी विद्यालय मुख्य शाखा, दादाराव मेश्राम विद्यालय, सर्वोदय विद्यालय, नूतन हिंदी शाळा, शिवाजी महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची, गुरुनानक विद्यालय, शाहबाबू उर्दू स्कूल, मुगल नॅशनल उर्दू माध्यमिक कन्या शाळा, ख्वाजा अजमेरी उर्दू हायस्कू लसह अफजा खानम उर्दू हायस्कूल, मुस्लीम उर्दू हायस्कूल या शाळा व महाविद्यालयातून मतदान उत्साहात पार पडले. याबाबत अधिक माहिती देताना निसर्गकट्टाचे अमोल सावंत यांनी सांगितले, की मतदान व निसर्ग संस्कार होण्यासाठी या निवडणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. शाळेत मतदान घेताना विद्यार्थीच मतदानाची सर्व प्रक्रिया मतदान अधिकारी म्हणून पार पाडतात. ही नवीन जबाबदारी पार पाडत असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून येतो. खूप आनंदाने ते या प्रक्रियेत सहभागी होताना दिसत आहेत. निवडणूक अधिकारी वैशाली देवकर, प्रकाश अंधारे, पक्षीमित्र दीपक जोशी, उदय वझे, देवेंद्र तेलकर, प्रा. राजा, प्रा.डॉ. मिलिंद शिरभाते, अमोल सावंत, अजिम शेख, शिवा इंगळे, गौरव झटाले, दिप्ती धोटे, माधुरी अंभोरे, कल्याणी देशमुख, प्रतीक्षा, अश्विनी धर्मे, ज्ञानेश्वरी सातारकर, राज निशाने, अभय साखरकर यांनी निवडणुकीच्या यशस्वीतेकरिता प्रयत्न केले.