बार्शीटाकळी-निहिदा रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:19 AM2021-02-13T04:19:08+5:302021-02-13T04:19:08+5:30
पारस येथे आधारकार्ड शिबिराचे आयोजन पारस: ग्रामपंचायतीतर्फे १५ फेब्रुवारीपासून ग्रामपंचायत भवनात आधारकार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नवीन ...
पारस येथे आधारकार्ड शिबिराचे आयोजन
पारस: ग्रामपंचायतीतर्फे १५ फेब्रुवारीपासून ग्रामपंचायत भवनात आधारकार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नवीन कार्ड काढणे, आधारकार्डमध्ये दुरुस्ती आदी कामे करण्यात येणार आहेत. याचा लाभ घेण्याचे आवाहन सरपंच संतोष साठे, उपसरपंच अरशिया अंजुम मोहम्मद जफर यांनी केले आहे.
-------------------------------
खुल्या बाजारात कापूस विक्रीकडे शेतकऱ्यांचा ओढा
पातूर: खुल्या बाजारात कापसाला चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकरी खुल्या बाजारात कापूस विक्रीकडे वळले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यानी शासकीय कापूस खरीदीकडे पाठ फिरविली आहे. खुल्या बाजारात ५,५०० ते ५,७०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.
-----------------------
रसवंती झाल्या सुरू; अनेकांना मिळाला रोजगार
पातूर: उन्हाळ्याची चाहूल सुरू झाली असून, दुपारी तापमान वाढले आहे. शहरात शीतपेयाची व उसाच्या रसाची मागणी वाढली असून, रसवंत्या सुरू झाल्या आहेत. यामुळे अनेकांना रोजगार प्राप्त झाला आहे. शहरात अकोला, बाळापूर, वाशिम मार्गांवर रसवंतीची दुकाने थाटली आहेत.
-----------
तानजापूर-देऊळगाव रस्त्याची दुर्दशा
अकोटः मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील अकोट-ताजनापूर -देऊळगाव रस्त्याची एका वर्षात दुर्दशा झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आदेश कंत्राटदारला देण्यात यावे. येत्या ८ दिवसांत काम सुरू न केल्यास कंत्राटदार घरासमोर ठिय्या मांडल्याशिवाय राहणार नाही, असे ताजनापूर येथील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव डोबाडे यांनी सांगितले.
------------------------------
अकोट येथे सहजयोग ध्यान शिबीर
अकोटः येथील श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज येथे १६ फेब्रुवारीपासून सहजयोग ध्यान शिबिरास प्रारंभ होत आहे. या शिबिरात दर मंगळवारी सायंकाळी ६ वाजता मास्क लावून यावे, असे सहजयोग ध्यान शिबिराच्या आयोजकांनी कळविले आहे.
----------------------------
खडकी येथील गोठ्याला आग
सायखेड: जामवसू गटग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या खडकी येथील शेतकरी अनिल दासू चव्हाण यांच्या गोठ्याला आग लागल्याची घटना ११ फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडली. या आगीत गुरांचा चारा, शेतीउपयोगी साहित्य, दुचाकीचे नुकसान झाले आहे. तलाठी वनिता चव्हाण, कोतवाल श्रीकृष्ण मागडे यांनी पंचनामा केला.
--------------------------------
महिलांना दस्तावेज त्वरित देण्याची मागणी
मूर्तिजापूर: तालुक्यातील सिरसो, चिंचखेड परिसरातील महिलांना दस्तावेज रेशनकार्ड, इलेक्शन कार्ड व जातीचे प्रमाणपत्र त्वरित द्यावे, तसेच गावात शिबीर घेऊन वाटप करावे, अशी मागणी महिला सक्षमिकरण महिला मंडळाने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.