माफसू अंतर्गत स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कुक्कुटपालन प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी जिल्हा कृषी उपसंचालक अरुण वाघमारे यांनी परसबागेतील कुक्कुटपालन केल्याने ग्रामीण भागात दैनंदिन गरजा भागविल्या जाऊ शकतात असे सांगितले. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते ‘परसबागेतील शास्त्रोक्त कुक्कुटपालन’ या तांत्रिक माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले व प्रशिक्षणार्थीना वाटप करण्यात आले. याप्रसंगी आत्माचे योगेश देशमुख, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व वरुण दळवी, संगणक आज्ञावली रुपरेषक यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ. सतीश मनवर, सूत्रसंचालन डॉ. एम.आर.वडे यांनी तर आभार डॉ. गिरीश पंचभाई यांनी मानले. यशस्वीतेसाठी पी.एल. ठाकूर यांनी योगदान दिले.
फोटो