राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 01:10 PM2018-12-26T13:10:09+5:302018-12-26T13:10:17+5:30

अकोला : राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन अ‍ॅग्रोटेक-२०१८ चे २७ ते ३१ डिसेंबरपर्यंत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजन करण्यात आले आहे.

 Preparation of state-level agricultural exhibition in the last phase! | राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात!

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात!

Next

अकोला : राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन अ‍ॅग्रोटेक-२०१८ चे २७ ते ३१ डिसेंबरपर्यंत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाची जय्यत तयारी सुरू असून, यावर्षी गतवर्षीपेक्षा दुप्पट शेतकरी या प्रदर्शनाला भेट देणार असल्याचा विश्वास कृषी विद्यापीठाला आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२० व्या जयंतीनिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला आणि प्रकल्प संचालक, आत्मा, कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित राज्यस्तरीय प्रदर्शनाला वेगळे महत्त्व आहे. राज्यातील शेती शाश्वत आणि शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्यासाठी शेतीशास्त्रातील अभिनव तंत्रज्ञान, कौशल्य, पूरक व्यवसायातील, गटशेतीतील, प्रक्रिया उद्योगातील संधी, बदलत्या जागतिक परिस्थितीत फायदेशीर शेतीचे तंत्र आणि एकंदरीत शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी आशादायी, प्रेरणादायी, व्यवसायाभिमुख माहितीचा खजिनाच यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे.
पाच दिवस दररोज दुपारी २.०० ते ४.०० वाजताच्या दरम्यान शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद, प्रगतशील शेतकºयांचे मनोगत व मान्यवरांच्या संबोधनासोबतच आपल्या मनोरंजनात्मक कलेतून समाजप्रबोधन करणारे अरविंद भोंडे, किशोर बळी, अनंत खेळकर आणि मिर्झा बेग शेतीविषयक माहिती मनोरंजनातून सांगणार आहेत.
 

 

 

Web Title:  Preparation of state-level agricultural exhibition in the last phase!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.