अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर जिल्हा परिषदेची सोमवार, १४ सप्टेंबर रोजी बोलविण्यात आलेली सर्वसाधारण सभा ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे आॅनलाइन पद्धतीने घेण्याची तयारी जिल्हा परिषद प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सर्वसाधारण सभांसह विविध विषय समित्यांच्या सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याचे निर्देश शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद विविध विषय समित्यांच्या सभा आॅनलाइन पद्धतीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येत आहेत; परंतु ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे घेण्यात येत असलेल्या सभांमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींमध्ये पदाधिकाऱ्यांसह सदस्यांना विषयांची मांडणी आणि प्रश्न उपस्थित करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आॅनलाइन घेण्यात येत असलेल्या सभांना जिल्हा परिषद पदाधिकाºयांसह सदस्यांकडून विरोध होत आहे; मात्र कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता, शासनाच्या निर्देशानुसार १४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभादेखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येणार आहे. त्यानुषंगाने नियोजित सर्वसाधारण सभा आॅनलाइन पद्धतीने घेण्याची तयारी जिल्हा परिषद प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभेत सहभागी होणाºया जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्यांसह संबंधित अधिकाºयांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही, यासंदर्भात नियोजन करण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ‘ऑनलाइन’ घेण्याची तयारी सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 10:57 AM