प्रधानसेवक मोदी खोटे बोलत आहेत; अँड. प्रकाश आंबेडकर यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 01:16 AM2017-11-08T01:16:41+5:302017-11-08T01:19:01+5:30
प्रधानसेवक सातत्याने खोटे बोलत आहेत, असे सांगत या प्रकाराचा निषेध ‘लुटारूंचा दिवस’ म्हणून भारि प-बहुजन महासंघ करणार आहे. नोटाबंदीमध्ये जीव गेलेल्यांना श्रद्धांजली व निषेध कार्यक्रम प्रत्येक जिल्हा व तालुक्यात घेण्याचे आवाहन पक्षाचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : प्रधानसेवक नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २0१६ रोजी एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा रद्द केल्या. आरबीआयच्या कायद्यानुसार हा निर्णय सेंट्रल कमिटीच घेऊ शकते, त्यानुसारची कार्यवाही आरबीआयकडून केली जाते. सेंट्रल कमिटीने हा निर्णय घेतला की नाही, हे अद्यापही गुलदस् त्यात आहे. त्याबाबत प्रधानसेवक सातत्याने खोटे बोलत आहेत, असे सांगत या प्रकाराचा निषेध ‘लुटारूंचा दिवस’ म्हणून भारि प-बहुजन महासंघ करणार आहे. नोटाबंदीमध्ये जीव गेलेल्यांना श्रद्धांजली व निषेध कार्यक्रम प्रत्येक जिल्हा व तालुक्यात घेण्याचे आवाहन पक्षाचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
नोटाबंदीसाठी जी कारणे देण्यात आली, त्यापैकी एक वगळता इ तर कारणांसाठी आरबीआयने २00५ च्या आधीच्या नोटा बदलण्याचा निर्णय घेतला होता. नोटाबंदीचे सर्मथन करताना प्रधानसेवकांनी काळा पैसा बाहेर काढणे, खोट्या नोटांना आळा घालणे, दहशतवादी कारवाया रोखणे, अशी कारणे दिली होती. त्यापैकी काहीही साध्य झाले नसल्याचेही अँड. आंबेडकर यांनी म्हटले आहे.
प्रधानसेवकांनी अमेरिका दौर्यात तेथील क्रेडिट कार्ड कंपन्यांच्या संघटनेबरोबर करारनामा करून त्यांना भारतात पूर्णपणे मोकळीक देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे ते सातत्याने प्लास्टिक मनी वापरण्याचे आवाहन करतात, त्याचे कारण अमेरिकन कंपन्यांबरोबर झालेला करारनामा असल्याचेही अँड. आंबेडकर यांनी म्हटले आहे.
३१ डिसेंबर २0१६ नंतर अनिवासी भारतीयांना नोटा बदलण्याचा अधिकार ठेवला. भारतीयांना दुसर्या देशाचे चलन ठेवता येत नाही. त्याप्रमाणे अनिवासी भारतीय दुसर्या देशाचे नागरिक अस तील, तर भारतीय चलन बाळगण्यावर र्मयादा आहेत. कोणता कायदा, नियमानुसार अनिवासी भारतीयांना भारतीय चलन बाळगता येते, याचे उत्तरही प्रधानसेवकांनी द्यावे, असे आव्हानही त्यांनी दिल्याचे पत्रक पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस ज.वि. पवार, सहजिल्हा प्रसिद्धिप्रमुख रणजित वाघ यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
काँग्रेस पाळणार काळा दिवस
नोटबंदीचा निर्णय हा देशाच्या आर्थिक विकासाला खिळ बसविणारा ठरला असून या निर्णयाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस बुधवार ८ नाव्हेंबर हा दिवस काळा दिवस म्हणून पाळणार आहे. स्थानिक स्वराज्य भवनातून काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोर्चा काढणार असून मदनलाल धिंग्रा चौकात निर्दशने करणार असल्याची माहिती महानगर अध्यक्ष बबनराव चौधरी तसेच जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांनी दिली.