अकोला : शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाºया पावन रामदेवबाबा-शामबाबा मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास शुक्रवारी मोठ्या भक्तिभावात प्रारंभ झाला. सात दिवस चालणाºया या सोहळ्यानिमित्त शुक्रवारी राणी सती धाम येथून गीता नगर परिसरातील मंदिरापर्र्यंत भव्य मंगल कलश शोभायात्रा काढण्यात आली.यात रथ,अश्व, दिंडी व भजनी मंडळे, तुताº्या,महिला-पुरुष आपल्या पारंपरिक वेषाभूषेत सहभागी झाले होते. महिलांनी कलश धारण करून यात सहभाग घेतला. रस्त्यात अनेक महिलां व मंडळांनी रांगोळ्या व तोरणे काढून या शोभायात्रेचे भक्तिभावात स्वागत केले. शोभायात्रेचे अनेक सेवाभावी सामाजिक संस्था व प्रतिष्ठान यांनी शोभायात्रेवर पुष्पवृष्टी करून स्वागत केले. यावेळी भाविकांना साहित्यांचे वितरणही करण्यात आले.स्थानीय तहसील चौकातील रुंगटा निवास्थानासमोर अग्रवाल समाजाने समाजाचे अध्यक्ष उमेश खेतान यांच्या उपस्थितीत आईस्क्रीमचे वितरण केले. पंडिताईंन प्रतिष्ठानच्या वतीने फराळ वितरण करण्यात आले. शोभायात्रा मनपा चौकात आल्यावर तेथे बंटी कागलीवाल यांच्या वतीने अमूल दूध वितरण करण्यात आले. मनपा परिसरात मनपाच्या वतीने महापौर विजय अग्रवाल यांनी स्वागत करून भाविकांना शुभेच्छा दिल्या. गांधी चौकात गोयनका परिवाराच्या वतीने थंडाई वितरण करण्यात आले.तर गांधी मार्गावर खंडेलवाल परिवाराच्या वतीने भाविकांना आईस्क्रीम प्रदान करण्यात आली.याच मार्गावरील राम मंदिर परिसरात रामभक्तांच्या वतीने व चित्रा चौकात भक्तांच्या वतीने ताक वितरण करण्यात आले.खोलेश्वर परिसरात माहेश्वरी समाजाच्या वतीने भाला निवासस्थानासमोर फराळ प्रदान करण्यात आला.तर समोरील परशुराम चौकात राजस्थानी ब्राह्मण समाजाच्या वतीने व ब्रह्मन् महिला मंडळाच्या वतीने प्रसादाचे वितरण करण्यात आले.मदन महाल समोर अग्रवाल महिला मंडळाच्या वतीने जल वितरण करण्याता रस्त्यावर निलेश आले. अग्रवाल परिवाराच्या वतीने थंडाई वितरण करण्यात येऊन शोभायात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी शेकडो महिला-पुरुष बच्चे कंपनी यात सहभागी झाले होते .