प्रतिबंधित ‘मोनोक्रोटोफॉस’ उठले शेतकऱ्यांच्या जीवावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 03:39 PM2019-08-31T15:39:28+5:302019-08-31T15:39:39+5:30

बहुतांश शेतकºयांना ‘मोनोक्रोटोफॉस’ या प्रतिबंधित कीटकनाशकामुळे फवारणीतून विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Prohibited 'Monocrotophos' causes contact poisining to farmers | प्रतिबंधित ‘मोनोक्रोटोफॉस’ उठले शेतकऱ्यांच्या जीवावर!

प्रतिबंधित ‘मोनोक्रोटोफॉस’ उठले शेतकऱ्यांच्या जीवावर!

googlenewsNext

- प्रवीण खेते
अकोला : जिल्ह्यात कीटकनाशकांच्या फवारणीतून विषबाधा झालेल्या शेतकऱ्यांचा आकडा १४६ वर पोहोचला असून, जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दररोज चार ते पाच विषबाधा झालेल्या शेतकºयांना दाखल केले जात आहे. यातील बहुतांश शेतकºयांना ‘मोनोक्रोटोफॉस’ या प्रतिबंधित कीटकनाशकामुळे फवारणीतून विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
गत महिनाभरापासून दररोज आठ ते दहा विषबाधेच्या रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये फवारणीतून विषबाधा झालेल्या शेतकºयांची संख्या जास्त आहे. विषबाधेचे हे सत्र सुरूच असून, दररोज चार ते पाच शेतकºयांना विषबाधा होत असल्याची घटना घडत आहे. गुरुवार, २९ आॅगस्ट रोजी यात आणखी भर पडली असून, आणखी चार शेतकºयांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. या शेतकºयांवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शेतकºयांना झालेली ही विषबाधा एकाच प्रकारच्या कीटकनाशकामुळे होत असल्याची धक्कादायक बाब उपचारादरम्यान सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांच्या निदर्शनास आली आहे. ‘मोनोक्रोटोफॉस’ असे या कीटकनाशकाचे नाव असून, ते प्रतिबंधित करण्यात आलेले आहे. प्रतिबंधित असतानाही त्याची बाजारात उघडपणे विक्री होत आहे. त्याचा थेट परिणाम शेतकºयांच्या जीवावर होत असून, काही शेतकºयांना प्राणही गमवावे लागले आहेत. सर्वोपचार रुग्णालयात या शेतकºयांवर उपचार सुरू असून, १२३ शेतकºयांची प्रकृती सुधारली असून, त्यांना सुटी देण्यात आली आहे. उर्वरित शेतकºयांवर उपचार सुरू असल्याची माहिती सर्वोपचार रुग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

गतवर्षीच करण्यात आले होते प्रतिबंधित
‘मोनोक्रोटोफॉस’ या कीटकनाशकाला महाराष्ट्र शासनातर्फे २७ मार्च २०१८ पासून प्रतिबंधित करण्यात आले होते. जुलै २०१७ मध्ये राज्यात ३३ पेक्षा जास्त शेतकºयांना या कीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधा झाल्याने शासनाने हा निर्णय घेतला होता.

विषबाधित शेतकºयांवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, यातील बहुतांश शेतकºयांना ‘मोनोक्रोटोफॉस’ नावाच्या कीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधा झाल्याचे उपचारादरम्यान समोर आले आहे. रुग्णांवर योग्य उपचार सुरू असून, त्यांना पाम इंजेक्शनचे अँटी डोस दिले जात आहेत.
-डॉ. श्यामकुमार शिरसाम, सहा. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.

 

Web Title: Prohibited 'Monocrotophos' causes contact poisining to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.