पातूर तालुक्यातील शिर्ला सौर उर्जा प्रकल्पाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 09:55 PM2017-12-19T21:55:03+5:302017-12-19T21:58:09+5:30

शिर्ला (अकोला): पातूर तालुक्यातील वीज भारनियमनाचा कायमस्वरूपी प्रश्न सोडविणार्‍या शिर्ला येथील सौर ऊर्जा प्रकल्पाचा प्रस्ताव १९ डिसेंबरच्या  दुपारी हिवाळी अधिवेशन काळात आमदार बळीराम सिरस्कार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला.

Proposal for Shirala Solar Power Project in Patur taluka submitted to Chief Minister! | पातूर तालुक्यातील शिर्ला सौर उर्जा प्रकल्पाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर!

पातूर तालुक्यातील शिर्ला सौर उर्जा प्रकल्पाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर!

Next
ठळक मुद्देआमदार बळीराम सिरस्कार यांचा पुढाकार२२ डिसेंबर रोजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनांत महत्त्वपूर्ण बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्ला (अकोला): पातूर तालुक्यातील वीज भारनियमनाचा कायमस्वरूपी प्रश्न सोडविणार्‍या शिर्ला येथील सौर ऊर्जा प्रकल्पाचा प्रस्ताव १९ डिसेंबरच्या  दुपारी हिवाळी अधिवेशन काळात आमदार बळीराम सिरस्कार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. शिर्ला सौर ऊर्जा प्रकल्पाबाबत कृतीशील आराखडा तयार करण्यासाठी  २२ डिसेंबर रोजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनांत महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे अशी माहिती बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळीराम सिरस्कार यांनी प्रस्तूत वार्ताहराला दिली.
पातूर तालुक्यातील विजेच्या तुडवड्यामुळे केवळ रात्रीच कृषी पंपाना वीज पूरवठा करण्यात येतो. त्यामुळे रात्री झोपेचा ताणामुळे शेतकर्‍यांवर  जीव अपघाताने गमावण्याची वेळ अनेकवेळा आली. त्याबरोबरच रात्रभर सिंचनासाठी घालवण्यासाठी वेळ गेल्याने दिवसा बाजारपेठेला जाणे शक्य होत नाही. परिणामी शेतकरी त्रस्त होते. उन्हाळ्यात  वीजेची मागणी पुर्ण होत नाही.परिणामी, गावातील छोटे-मोठे उद्योग प्रभावित होतात ,त्याबरोबरच घरातील उपकरणे बंद राहिल्याने गावकरी त्रस्त होतात.
पारस औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र केवळ ४0 कि.मी. अंतरावर असूनही पातुर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये विजेचा तुटवडा  जाणवत आहे. अशास्थितीत   शिर्ला येथील ४६ हेक्टरवरील  प्रस्तावित  सौर ऊर्जा प्रकल्प पातूर तालुक्यातील विजेचा तूडवडा दूर करू शकेल. त्याबरोबरच दहा हजारांहून अधिक कृषीपंपाना तथा गावांना दिवसभर अखंड वीजपुरवठा सुरळीत मिळू शकेल.त्याचे सकारात्मक दूरगामी परिणाम दिसून येतील असे आमदार बळीराम सिरस्कार यांनी सांगितले. सदर सौर ऊर्जा प्रकल्प तातडीने पाठपुरावा करून पुर्ण केला जाईल असेही त्यांनी दुरध्वनीवरून सांगितले.   सौर ऊजेर्चा वापर करून वीजेची गरज भागविणारा पातुर तालुक्यातील शिर्ला सौर ऊर्जा प्रकल्प पहिला ठरेल एवढे मात्र नक्की.

Web Title: Proposal for Shirala Solar Power Project in Patur taluka submitted to Chief Minister!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.