लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अकोला पंचायत समितीमधील बांधकाम विभागात कार्यरत असलेला वादग्रस्त कनिष्ठ अभियंता किशोर राऊत याच्यावर कंत्राटदाराच्या खिशातील पाच हजार रुपये बळजबरी हिसकावल्याने त्याच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्या प्रकरणात राऊत याच्यावर निलंबनाच्या कारवाईची टांगती तलवार आहे. तसा प्रस्ताव बांधकाम विभागाकडून मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे सादर करण्यात आल्याची माहिती आहे. शासकीय कंत्राटदार अक्षय कुळकर्णी यांना लोणाग्रा येथील रस्ता बांधकामाचा कंत्राट देण्यात आला. सहा लाख रुपयांच्या र्मयादेत कंत्राटदाराने रस्त्याचे बांधकाम केले. त्या कामासाठी देयकाच्या २५ टक्के रकमेची मागणी राऊत याने केली. त्याचवेळी ७५ हजार रुपये आधीच दिले होते, अशी तक्रार कंत्राटदाराने केली; मात्र राऊत याने २५ हजार रुपयांची मागणी सुरूच ठेवली. तहसील कार्यालयाजवळ राऊत व कुळकर्णी उभे असताना शाखा अभियंता राऊत याने कुळकर्णी यांच्या खिशातील पाच हजार रुपये बळजबरी हिसकल्याची तक्रार कंत्राटदाराने केली. पाच हजार रुपये बळजबरी हिसकावल्याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी शाखा अभियंता किशोर राऊत याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३९२ नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने राऊत याच्या निलंबनाचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे सादर केल्याची माहिती आहे. त्यावर मंगळवारी निर्णय झाला नाही. उद्या बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडून त्याबाबत आदेश दिले जाण्याची शक्यता आहे.
अकोला पंचायत समितीमधील वादग्रस्त कनिष्ठ अभियंता राऊत याच्या निलंबनाचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 2:36 AM
अकोला: अकोला पंचायत समितीमधील बांधकाम विभागात कार्यरत असलेला वादग्रस्त कनिष्ठ अभियंता किशोर राऊत याच्यावर कंत्राटदाराच्या खिशातील पाच हजार रुपये बळजबरी हिसकावल्याने त्याच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
ठळक मुद्देकंत्राटदाराच्या खिशातील पाच हजार रुपये बळजबरी हिसकावलेकोतवाली पोलीस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल