३० मीटर अंतरातील प्रलंबित कृषीपंपाना २४ तासांत वीज जोडणी द्या; संजय ताकसांडे यांचे निर्देश
By Atul.jaiswal | Published: November 17, 2022 05:47 PM2022-11-17T17:47:44+5:302022-11-17T17:48:41+5:30
अकोला - पैसे भरून प्रलंबित असेलेल्या राज्यातील एक लाख कृषी पंपाना डिसेंबर २०२२ पर्यंत वीज जोडणी देण्याचा महावितरणचा निर्धार ...
अकोला - पैसे भरून प्रलंबित असेलेल्या राज्यातील एक लाख कृषी पंपाना डिसेंबर २०२२ पर्यंत वीज जोडणी देण्याचा महावितरणचा निर्धार असल्याने, ३० मीटर अंतरातील प्रलंबित कृषीपंपाना २४ तासात वीज जोडणी देण्याचे निर्देश महावितरणचे संचालक (संचलन) संजय ताकसांडे यांनी गुरुवारी (१७ नोव्हेंबर) येथे दिले.येथील 'विद्युत भवन'’ सभागृहात अकोला परिमंडलाच्या आढावा बैठकीत वीज जोडणीच्या कामात हयगय करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा सुचक इशारा देताना ताकसांडे म्हणाले की, एक लाख कृषी पंपाच्या वीज जोडणी देण्याच्या उद्दीष्टानुसार महावितरणकडून नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार ३० मीटर अंतरापर्यंतच्या प्रलंबित वीज जोडण्या २४ तासांत देण्यात याव्यात. तसेच ३१ ते २०० मीटर अंतर असलेल्या प्रलंबित कृषी पंप वीज जोडणीसाठी उपलब्ध असलेल्या आकस्मिक निधीच्या कामाचे शंभर टक्के आदेश काढण्यात यावे.
कृषी आकस्मिक निधी कसा वाढविता येयील त्यादृष्टीने प्रयत्न झाले पाहीजे.तसेच २०१ मीटर ते ६०० मीटर अंतरातील प्रलंबित वीज जोडणीसाठी जिल्ह्यानुसार निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. बैठकीला प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता अनिल डोये,उप महाव्यवस्थापक (मात)प्रमोद खुळे, अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट(अकोला), मंगेश वैद्य(वाशिम), बद्रीनाथ जायभाये(बुलढाणा), अनिल वाकोडे, हरीश गजबे, वाय.डी.मेश्राम, नारायण लोखंडे यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंते, कार्यकारी अभियंता चाचणी,कार्यकारी अभियंता स्थापत्य, उपविभागीय अभियंते, उपस्थित होते.