वांदिले यांच्या 'ग्रासेस ऑफ विदर्भ' पुस्तकाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:19 AM2021-07-30T04:19:27+5:302021-07-30T04:19:27+5:30

....................... राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाकडून पूरग्रस्ताना मदत अकोला : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे हजारो नागरिक बाधित ...

Publication of Vandile's book 'Graces of Vidarbha' | वांदिले यांच्या 'ग्रासेस ऑफ विदर्भ' पुस्तकाचे प्रकाशन

वांदिले यांच्या 'ग्रासेस ऑफ विदर्भ' पुस्तकाचे प्रकाशन

Next

.......................

राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाकडून पूरग्रस्ताना मदत

अकोला : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे हजारो नागरिक बाधित झाले. या पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने गुरुवारी मदत साहित्य पाठविण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद विद्रोही यांच्या आवाहनानुसार अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस जावेद जकारिया यांच्या पुढाकाराने ही मदत पाठविली आहे. यावेळी माजी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष श्रीकांत पाटील पिसे, महानगर कार्याध्यक्ष साई युसूफ अली, माजी महानगर अध्यक्ष राजकुमार मूलचंदानी, माजी नगरसेवक मो.फझलू, अजीज शे. सिकंदर आदी उपस्थित होते.

......................................

जीएमसीतील नॉनकोविड ओपीडीत रुग्णांची गर्दी!

अकोला : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने सर्वोपचार रुग्णालयातील नॉनकाेविड वॉर्ड पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. शिवाय, नॉनकोविड ओपीडीत रुग्णांची गर्दीही वाढू लागली असून, दररोज सुमारे १ हजारापेक्षा जास्त रुग्णांची ओपीडीमध्ये आरोग्य तपासणी केली जात आहे.

.....................

जीएमसीत नेत्र शस्त्रक्रिया पुन्हा सुरू

अकोला : कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे नॉनकोविड वैद्यकीय सेवा पुन्हा प्रभावित झाली होती. त्यामुळे विविध शस्त्रक्रियाही रखडल्या होत्या; मात्र आता कोविडची ही लाट ओसरू लागल्याने रखडलेल्या शस्त्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने वाॅर्ड क्रमांक २१ नेत्र रुग्णांसाठी पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.

..............

Web Title: Publication of Vandile's book 'Graces of Vidarbha'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.