अकोला : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने पुणे आणि बिलासपूर दरम्यान साप्ताहिक विशेष अतिजलद रेल्वे गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीला अकोला रेल्वेस्थानकावर थांबा असल्याने अकोलेकरांची सोय झाली आहे.
मध्य रेल्वेच्या भूसावळ मंडळ कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, ०८२३० विशेष अतिजलद साप्ताहिकदि. ही गाडी २ जुलैपासून पुढील सुचना मिळेपर्यंत दर शुक्रवारी पुण्याहून १७.४० वाजता सुटेल आणि बिलासपुर येथे दुसर्या दिवशी १५.५५ वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक ०८२३९ विशेष अतिजलद साप्ताहिक ही गाडी १ जुलैपासून पासून पुढील सुचना मिळेपर्यंत बिलासपूर येथून दर गुरुवारी सकाळी ११.२० वाजता सुटेल आणि पुण्याला दुस-या दिवशी ०९.०५ वाजता पोहोचेल.
या गाडीला दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, राजनांदगाव, दुर्ग, रायपूर, भाटापारा येथे थांबे असणार आहेत.
पूर्णपणे आरक्षित अतिजलद विशेष गाडी साठी २३ जून रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर बुकिंग सुविधा सुरु राहणार आहे.