अकोला: जिल्ह्यात शुक्रवारपासून महामार्गावर हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. तर हेल्मेट घालणाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या निर्देशानुसार शुक्रवारपासून जिल्ह्यात महामार्गावर हेल्मेट सक्ती करण्यात आली. त्या अनुषंगाने विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांवर शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके, पोलीस उपनिरीक्षक सुरेश वाघ यांच्या नेतृत्वात दंडात्मक कारवाई करण्यात आली. शुक्रवारी सकाळपासूनच शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी शहरालगत महामार्गावर विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. कारवाईदरम्यान काही दुचाकी चालक हेल्मेट घातलेले आढळून आले. यावेळी त्यांचा जागरूक नागरिक म्हणून पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या हस्ते त्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यातील बहुतांश चालकांनी दुचाकी खरेदी केल्यापासूनच हेल्मेट घालत असल्याचे सांगितले. ही मोहीम महामार्गावर सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विनाहेल्मेट दुचाकीस्वारांविरुद्ध दंडात्मक कारवाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2020 10:56 AM
Akola विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.
ठळक मुद्देमहामार्गावर हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. हेल्मेट घालणाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.