अकोला : राज्यात आतापर्यंत २१ लाख हेक्टर म्हणजेच ३७ टक्केच रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. परतीचा पाऊस लांबल्याने यावर्षी रब्बी पेरणीचा हंगाम एक महिना पुढे गेला असल्याचे तज्ज्ञाने म्हणणे आहे.राज्यातील रब्बी हंगामातील पीक पेरणीचे क्षेत्र ५६ लाख हेक्टर आहे. आतापर्यंत ९० टक्केच्यावर पेरणी अपेक्षित होती. तथापि, पाऊस आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यातही पडल्याने खरीप हंगामातील पिके काढणीस विलंब झाला. परिणामी रब्बी पिकांच्या पेरणीसाठी मशागतीची कामे उशिरा सुरू झाली. त्यामुळे राज्यात सर्वत्र पेरण्यांना उशीर होत आहे. विदर्भातील अमरावती विभागात यावर्षी ६ लाख ३५ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले. प्रत्यक्षात आतापर्यंत १ लाख व हजार हेक्टरवर म्हणजेच २६ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक हरभरा पेरणीवर शेतकऱ्यांनी भर दिला आहे.दरवर्षी हरभरा पेरणी सर्वसाधारण नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आाठवड्यापर्यंत तर गहू पिकाची पेरणी १५ डिसेंबरपर्यंत करता येते; परंतु यावर्षी ऋतूचक्र बदलले असून, जमीन ओली आहे. म्हणूनच या दोन्ही पिकांची पेरणी १५ डिसेंबरपर्यंत करता येईल, अशी शिफारस करण्यात आली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गहू पेरणी १५ जानेवारीपर्यंत होण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली आहे.
- सिंचनाला पाणी उपलब्धराज्यात जवळपास सर्वच धरणात मुबलक पाणी उपलब्ध असल्याने धरणांच्या क्षेत्रात येणाºया रब्बी पिकांना पाणी मिळणार आहे. म्हणूनच शेतकरी यावर्षी गव्हाची पेरणी १५ जानेवारीपर्यंत करण्याची शक्यता आहे. काही भागात कोरडवाहू क्षेत्रावरही शेतकऱ्यांनी गहू पेरणी केली आहे.
रब्बी पेरणीचा हंगाम एक महिना पुढे गेला असून, गहू, हरभरा पेरणी १५ नोव्हेंबरपर्यंत केली जाते. यावर्षी १५ डिसेंबरपर्यंत पेरणी करता येईल, अशी शिफारस करण्यात आली आहे.- डॉ.एन.आर. पोटदुखे,विभागप्रमुख,कडधान्य विभाग,डॉ. पंजबाराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.