विद्यार्थ्यांसोबत राहुल गांधी यांनी गायले राष्ट्रगान; अकोल्याच्या श्री जागेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले मंत्रमुग्ध 

By आशीष गावंडे | Published: November 17, 2022 08:16 PM2022-11-17T20:16:46+5:302022-11-17T20:17:56+5:30

विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर गीतांमुळे परिसरात नवचैतन्य निर्माण झाले होते. 

rahul gandhi sang national anthem with students of shree jageshwar vidyalaya of akola | विद्यार्थ्यांसोबत राहुल गांधी यांनी गायले राष्ट्रगान; अकोल्याच्या श्री जागेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले मंत्रमुग्ध 

विद्यार्थ्यांसोबत राहुल गांधी यांनी गायले राष्ट्रगान; अकोल्याच्या श्री जागेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले मंत्रमुग्ध 

googlenewsNext

आशिष गावंडे/ अकोला

काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्या पदयात्रेदरम्यान गुरुवारी वाडेगाव येथील श्री जागेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनेक देशभक्तीपर गीत गाऊन राहुल गांधी यांच्या पदयात्रेचे स्वागत केले. यावेळी राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांसोबत राष्ट्रगान गायले. विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर गीतांमुळे परिसरात नवचैतन्य निर्माण झाले होते. 

विदर्भाची बारडोली असे समजल्या जाणाऱ्या बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे गुरुवारी राहुल गांधी यांची पदयात्रा दाखल झाली असता उपस्थित नागरिकांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. ठीकठिकाणी रांगोळी व फुलांची आरास करण्यात आली होती. यात्रेच्या मार्गावरील श्री जागेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गाऊन पदयात्रेचे स्वागत केले. 

यावेळी संगीत विभागाचे श्रीकांत पळसकार, मनोज जहागीरदार यांनी साथ दिली. पदयात्रेचे स्वागत करताना
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष मानकर, उपाध्यक्ष वसुदेवराव फाळके, सचिव हिम्मतरावजी घाटोळ, सदस्य विश्वनाथजी मानकर, मुख्याध्यापक सुनील मसने, उपमुख्याध्यापक अविनाश शिंदे, पर्यवेक्षक गोपाल मानकर तसेच जागेश्वर कॉन्वेन्ट, जागेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी आदि उपस्थित होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: rahul gandhi sang national anthem with students of shree jageshwar vidyalaya of akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.