लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या येवता येथील कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी छापा टाकून वेश्या व्यवसाय करणाºया दोन महिलांविरुद्ध बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. ही कारवाई शुक्रवारी दुपारी करण्यात आली.स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक छाया वाघ यांना येवता येथे एका घराच्या खोलीमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यांनी सापळा रचला आणि आधी एका फंटरला पाठवून माहिती काढण्यास सांगितले.फंटरच्या माध्यमातून एका खोलीमध्ये दोन महिला ग्राहकांकडून पैसे घेऊन वेश्या व्यवसाय करीत असल्याचे स्पष्ट झाल्यावर पीएसआय वाघ यांनी पोलीस पथकासह येवता येथील कुंटणखान्यावर शुक्रवारी अचानक छापा टाकला. दरम्यान, दोन महिला व काही ग्राहक लैंगिक चाळे करीत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्या दोन महिलांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली.या महिला काही महिन्यांपासून परिसरात वेश्या व्यवसाय करीत होत्या. त्यामुळे गावातील लोकांना त्रास सहन करावा लागत होता.पोलिसांनी त्या दोन महिलांविरुद्ध भादंवि कलम ३, ४, ५, ५(१)(क), ९ आणि अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमनुसार बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कारवाई मूर्तिजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी रवी पालिवाल, गणेश धुंपटवाड, गोपाल पाटील, भाग्यश्री मेसरे व तृष्णा घुमन यांच्या पथकाने केली.वर्षभरापूर्वीसुद्धा केली होती कारवाईयेवता येथील कुंटणखान्यावर एलसीबी पोलिसांनी शुक्रवारी कारवाई केली. एक वर्षापूर्वीसुद्धा एसीबी पोलिसांनी या कुंटणखान्यावर छापा टाकून काही मुलींसह एका महिलेला अटक केली होती. हा कुंटणखाना राजकीय पृष्ठभूमी असलेली महिला चालवित असल्याची माहिती आहे. या महिलेवर या प्रकरणात न्यायालयात खटलासुद्धा सुरू आहे. काही बड्या असामींचा वरदहस्त या महिलेवर असल्याने तिने देह व्यापार सुरूच ठेवला होता अशी चर्चा आहे.