अकोला : शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांचे विशेष पथक मंगळवारी गस्तीवर असताना, कौलखेड चौकातील एका दुकानामध्ये आॅनलाइन कॅसिनो जुगारावर पथकाने छापा घातला. पथकाने जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करीत, जुगार अड्ड्यातून १२ जणांना अटक केली. त्यांच्याकडून ७७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.पोलीस उपअधीक्षकांचे पथक गस्तीवर असताना, कौलखेड चौकातील एका दुकानामध्ये आॅनलाइन जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने खदान पोलिसांसह आॅनलाइन जुगारावर छापा घातला. या ठिकाणी पैशांच्या हारजितवर आॅनलाइन कॅसिनो जुगार खेळला जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी आरोपी मनोज बलराम सिरसाट, मंगलदास वसंता देवकते, विजय उत्तम चव्हाण, सतीश विनायक बायस्कर, सतीश बळीराम सिरसाट, राजू मधुकर धारणे, मिलिंद गजानन पाटील, अब्दुल कलाम अब्दुल रऊफ, वैभव संजय नागे, विजय प्रल्हाद भगत, रवी श्रीकृष्ण भगत आणि सुभाष रामचंद्र तायडे यांना अटक केली. त्यांच्याकडून कॅसिनो गेम जुगाराचे साहित्य आणि रोख ७७ हजार १४0 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियमनुसार खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)छाया: न्यूज व्रॅपमध्ये