अवकाळी पावसाने लाखो हेक्टरवरील कापूस भिजला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 03:25 PM2019-12-27T15:25:21+5:302019-12-27T15:25:26+5:30
अगोदरच कापसाचे उत्पादन घटले आहे. पुन्हा हे नवे संकट उभे ठाकल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
- राजरत्न सिरसाट
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : निसर्गाच्या लहरीपणाचा पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला असून, शेतकऱ्यांवर हीसंकटाची मालिकाच सुरू आहे. गत दोन दिवसांपासून पुन्हा अवकाळी पाऊस पडत असल्याने लाखो हेक्टर शेतातील कापूस भिजला आहे. अगोदरच कापसाचे उत्पादन घटले आहे. पुन्हा हे नवे संकट उभे ठाकल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
यावर्षी राज्यात ४२ लाख हेक्टरवर कापूस पेरणी झाली आहे; परंतु सुरुवातीला कमी पाऊस झाल्याने पेरणीस विलंब झाला. हे पीक परिपक्वतेच्या अवस्थेत असतानाही सतत पाऊस सुरू होता. त्याचा परिणाम कापूस उत्पादनावर झाला असून, उतारा घटला आहे. सध्या कापूस वेचणी सुरू आहे; पण पंधरा दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. गत चोवीस तासांत गुरुवार, २६ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजतापर्यंत विदर्भात बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. मध्य महाराष्टÑ व मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस पडला आहे. या पावसाने कापूस पीक तर भिजलेच तूर पिकावरही परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
विदर्भात १७ लाख ४९ हजार ९५ हेक्टरवर कापूस पेरणी झाली आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडला असून, कापूस पीक भिजले आहे. त्यामुळे कापसाची प्रत खराब होणार असल्याने भिजलेला कापूस ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतंत्र व्यवस्था करावी लागणार आहे. शासकीय कापूस खरेदी केंद्रावर अगोदरच ८ टक्के आर्द्रता व इतर निकष लावून कापूस खरेदी केला जात आहे. त्यामुळे भिजलेला कापूस व्यापाºयांनाच विकावा लागणार असल्याने भाव किती मिळतात, हा प्रश्न शेतकºयांसमोर उभा ठाकला आहे. अकोला जिल्ह्यात बुधवारी रात्री १२ ते २.३० वाजतापर्यंत बहुतांश ठिकाणी पाऊस पडला. त्यामुळे या जिल्ह्यातील कापूस चांगलाच भिजला आहे.
या सर्व विषम वातावरणामुळे कीड, रोगाचा प्रादुर्भावही वाढला असून, कपाशीवर गुलाबी बोंडअळी तर तुरीवर शेंगा पोखरणाºया अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. तूर पीक यावर्षी बºयापैकी आले आहे; परंतु निसर्गाच्या लहरीपणाचा फटका या पिकालाही बसत आहे.शेतकºयांनी काळजी घेण्याचा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून देण्यात येत असल्याचे कृषी विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. एम. मानकर यांनी सांगितले.