कौलखेड चौकात रॅपीड टेस्ट शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:18 AM2021-02-14T04:18:32+5:302021-02-14T04:18:32+5:30
बाबुरामजी यादव बुधवारी मूर्तिजापुरात अकोला : जय गुरुदेव महाराज मथुरा यांचे शिष्य व जय गुरुदेव संगत मथुराचे राष्ट्रीय महामंत्री ...
बाबुरामजी यादव बुधवारी मूर्तिजापुरात
अकोला : जय गुरुदेव महाराज मथुरा यांचे शिष्य व जय गुरुदेव संगत मथुराचे राष्ट्रीय महामंत्री बाबुरामजी यादव बुधवारी (दि.१७) गुरु महाराज यांच्या पादुकांच्या गाडीसह मूर्तिजापूर तालुक्यातील लोणसना येथे येणार आहेत. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राजेश अनासुने, छगन येवोकार यांनी केले आहे.
महाविद्यालयांमध्ये कोविड नियमांचे पालन नाहीच
अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या महाविद्यालये बंद आहेत; मात्र परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या निमित्ताने महाविद्यालयात विद्यार्थ्यांची गर्दी वाढू लागली आहे. अर्ज सादरीकरणासाठी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी रांगेत लागत असून, येथे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत नाही. अनेकजण मास्कचादेखील वापर करीत नसल्याचे दिसून येते.
नदीपात्रात अस्वच्छता
अकोला : शहराच्या मध्यातून वाहणाऱ्या मोर्णा नदीचे सौंदर्यीकरण करण्यात येणार होते; मात्र हे काम थंडबस्त्यात पडले असून, अनेकजण नदी पात्रातच कचरा आणून टाकताना दिसून येतात. शिवाय, शहरातील सांडपाणी थेट नदीत सोडण्यात येत असल्याने नदीपात्रात गटाराची निर्मिती झाली आहे.
जीएमसीत रुग्णांसाठी मदत कक्षच नाही
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात नॉन कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. यातील अनेक रुग्ण बाहेर गावाहून येणारे आहेत. त्यामुळे कोणता वॉर्ड कुठे हे अनेकांना माहिती नसल्याने त्यांच्यात गोंधळाची स्थिती असते. अशा रुग्णांसाठी रुग्णालय परिसरात मदत कक्ष नसल्याने दलालांकडून त्याचा फायदा घेतला जात आहे.