क्युआर कोड अनिवार्य
क्लाउड पॅथोलॉजी लॅबद्वारे प्राप्त आरटीपीसीआर चाचणी अहवालामध्ये क्युआर कोड अनिवार्य करण्यात आला आहे. त्याचा उपयोग परदेशी जाण्यासाठी विमानसेवेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना होणार आहे.
ही काळजी आवश्यक
क्लाउड पॅथोलॉजी लॅबद्वारे प्राप्त आरटीपीसीआर अहवालामध्ये चुकी झाल्यास त्यामध्ये दुरुस्त करणे शक्य नाही.
त्यामुळे स्वॅब संकलन केंद्रावर माहिती देताना ती अचूक देणे गरजेचे आहे.
आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक आणि रहिवासी पत्ता ही माहिती योग्य नोंदविली की नाही, याची खातरजमा करणेही गरजेचे आहे.
नागरिकांना आरटीपीसीआर चाचणी अहवाल मिळण्यास सोईचे जावे, या अनुषंगाने क्लाउड पॅथोलॉजी लॅबद्वारे नागरिकांना मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला जातो. त्यामुळे नागरिकांना चाचणी अहवालासाठी गर्दीच्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. घरी बसूनच अहवाल पॉझिटिव्ह की, निगेटिव्ह याची माहिती मिळणे शक्य झाले आहे.
- डॉ. नितीन अंभोरे, विभाग प्रमुख, व्हीआरडीएल, जीएमसी, अकोला